scorecardresearch

Premium

सायलीचा जीव अर्जुन कसा वाचवणार? जुई गडकरीने शेअर केला ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो

‘ठरलं तर मग’च्या आगामी भागात काय होणार? मालिकेचा नवा प्रोमो आला समोर

tharla tar mag serial new promo
जुई गडकरीने शेअर केला 'ठरलं तर मग'चा नवा प्रोमो

‘ठरलं तर मग’ मालिकेला प्रेक्षकांचा अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सायली-अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट लग्न, मालिकेत येणारे ट्विस्ट यामुळे गेले कित्येक महिने ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या गणेश उत्सव विसर्जनाच्या भागात सायलीवर महिपत आणि नागराज यांच्या गुंडांनी हल्ला केल्याचं दाखवण्यात आलं. आता आगामी भागात मालिकेच्या कथानकात काय ट्विस्ट येणार हे जाणून घेऊया…

हेही वाचा : “‘सत्याची’ ताकद व्हती”, किरण मानेंची गांधी जयंतीनिमित्त पोस्ट; म्हणाले, “यांच्या हजार पिढ्या…”

tharala tar mag marathi serial update
अपघातानंतर प्रतिमाची गेली वाचा अन् सायली…, ‘ठरलं तर मग’ मालिकेचं कथानक रंजक वळणावर, पुढे काय घडणार?
Tharla tar mag fame jui gadkari
Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी मालिकेच्या सेटवर २ ते ४ काय करते? पाहा…
rupali bhosale shared upcoming promo of serial
Video : “संजनाने दहीहंडी फोडली पण…”, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
tharala tar mag new promo
प्रियाचा खोटेपणा अर्जुन सर्वांसमोर आणेल का? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार रंजक वळण, जुई गडकरीने शेअर केला प्रोमो

‘ठरलं तर मग’ मालिकेचा नवा प्रोमो अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मालिकेच्या गेल्या काही भागांमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सायलीवर महिपत आणि नागराजने पाठवलेले गुंड चाकूहल्ला करतात. तेव्हा सायली जोरात अर्जुनला हाक मारते. पोटावर वार केल्याने ती बेशुद्ध होऊन खाली पडते. सायलीवर पुढचा वार होण्याच्या आधी अर्जुन तेथे पोहोचतो आणि सायलीला सावरतो. पुढे अर्जुन तिला अस्वस्थ होऊन रुग्णालयात दाखल करतो असं दाखवण्यात आलं आहे. यादरम्यान, सायली-अर्जुनला संपर्क करण्याचा घरातील सगळे लोक प्रयत्न करत असतात. शेवटी अर्जुन चैतन्यचा फोन उचलतो आणि घडलेली संपूर्ण परिस्थिती त्याला सांगतो.

हेही वाचा : “शाळेत उंचीमुळे मला…”, ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “आज तुमच्यासमोर सुवर्णपदक…”

अर्जुनने सायलीवर हल्ला झाल्याचं सांगितल्यावर कल्पना, प्रिया, रविराज आणि चैतन्य रुग्णालयात पोहोचतात. डॉक्टर सायलीची प्रकृती अतिशय गंभीर असून तिला तातडीने रक्ताची गरज असल्याचं अर्जुनला सांगतात. सायलीच ब्लडग्रुप ओ निगेटिव्ह असल्याने तिला कुठेच रक्त मिळत नाही. अशा परिस्थितीत रविराज किल्लेदार ( सायली म्हणजेच तन्वीचे खरे बाबा) या कठीण प्रसंगातून सायली नक्की वाचणार असं म्हणतात. रविराज सायलीची बाजू घेत असल्याचं पाहून प्रिया आश्चर्य व्यक्त करते असं आगामी प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा : “आदल्या दिवशीचा चिकनचा रस्सा, शिळी भाकरी अन्…” दुबईत फिरणाऱ्या मराठी अभिनेत्याला येतेय मराठमोळ्या खाद्यपदार्थांची आठवण, म्हणाला…

सायली हिच खरी तन्वी असल्याचं सत्य अद्याप मालिकेत कोणालाच माहिती नाही. तन्वी ही रविराज-प्रतिमाची मुलगी असते. त्यामुळे सायली आणि रविराज किल्लेदार यांचं रक्तगट एकच असण्याची दाट शक्यता आहे. रविराज सायलीला रक्त देणार का? त्यांचा रक्तगट एकच असेल का? अर्जुन सायलीचा जीव कसा वाचवणार? हे प्रेक्षकांना येत्या काही भागांत पाहायला मिळणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tharla tar mag serial new promo shared by jui gadkari sayali hospitalized due to attacked sva 00

First published on: 02-10-2023 at 13:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×