TV Actress Buys Second New Home In Mumbai : मुंबईत घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. या घरासाठी प्रत्येकजण तितकीच मेहनतही करत असतो. सामान्य मुंबईकराप्रमाणे कलाकार मंडळींचेसुद्धा मुंबईत घेर घेण्याचे स्वप्न असते. आजवर अनेक कलाकारांनी त्यांचे हे स्वप्न पूर्णही केलं आहे. नुकताच मराठी अभिनेता गौरव खन्नाने मुंबईत नवीन घर घेतलं. यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्रीने मुंबईत घर घेतले आहे. ही अभिनेत्री म्हणजे चाहत पांडे.
हिंदी टीव्ही व मालिकांमुळे चाहत पांडे हे प्रेक्षकांमधील एक लोकप्रिय नाव आहे. नुकत्याच झालेल्या कलर्स टीव्हीवरील ‘द ५०’ या रिअॅलिटी शोमुळे चाहत चांगलीच चर्चेत आली. विशेषतः या शोमधील तिचा स्पर्धक रजत दलालबरोबरची मैत्री आणि खानझादीबरोबर झालेलं तिचं जोरदार भांडण यामुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेत राहिली.
चाहत सोशल मीडियावर सुद्धा तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचे विविध लुकमधील फोटो-व्हिडीओ शेअर करत असते. अशातच चाहतने तिच्या सोशल मीडियाद्वारे नव्या घराचे काही खास क्षण शेअर केले होते. विशेष म्हणजे अभिनेत्रीचे हे मुंबईतले दुसरे घर आहे. ‘आयडब्ल्यूएम बझ’ने दिलेल्या माहितीनुसार, चाहतने मुंबईत स्वतःचं दुसरं घर खरेदी केलं असून तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या नवीन घराची झलक दाखवली. ही आनंदाची बातमी शेअर करताना तिने स्वतःला खूप नशीबवान मानले आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमधून चाहतने तिच्या बाल्कनीतून बाहेरचे शहर पाहताना आणि निवांत क्षण अनुभवताना दिसत आहे. स्वतःचं स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद आणि समाधान तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.

यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये चाहतने मुंबईत तिचं पहिलं घर घेतल्याची बातमी शेअर केली होती. त्यानंतर तिने आपल्या बुंदेलखंड या गावी नवीन घर बांधले आणि दुसऱ्या घराचे नूतनीकरणही केले. याव्यतिरिक्त, चाहतने काही व्यावसायिक मालमत्तांमध्येही गुंतवणूक केल्याचे समजते, ज्यावरून ती भविष्यासाठी अतिशय विचारपूर्वक पावले उचलत असल्याचे दिसून येते.
चाहतच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिने ‘पवित्र बंधन’, ‘हमारी बहू सिल्क’, ‘नथ: झेवर या जंजीर’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ती ‘बिग बॉस १८’ मध्ये ती एक स्पर्धक म्हणून दिसली होती. त्याचबरोबर The 50 शोद्वारेसुद्धा ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
