Chetan Wadnere and Rujuta Dharap Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शुभंकर एकबोटे आणि अमृता बने या लोकप्रिय जोडीपाठोपाठ आता आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडनेरेने लग्न केलं आहे. इन्स्टाग्रामवर लग्नातील सुंदर असे फोटो शेअर करत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

चेतन वडनेरे आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऋजुता धारप यांनी लग्नातील फोटो शेअर करत या फोटोंना ‘कुर्यात सदा मंगलम्’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीने लग्नात मोरपिशी रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी, त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज, पारंपरिक दागिने असा लूक केला आहे. तर, चेतनने लग्नात सोहळं नेसलं होतं. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Thipkyanchi Rangoli fame actress Sai Kalyankar entry in Shubh Vivah marathi serial
Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीची ‘शुभविवाह’ मालिकेत एन्ट्री, झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत
Thipkyanchi Rangoli fame sarika nawathe play role in Maati Se Bandhi Dor hindi serial new promo out
Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्रीची ‘स्टार प्लस’च्या हिंदी मालिकेत ट्रॅक्टरवरून दमदार एन्ट्री, पाहा जबरदस्त प्रोमो
Tharala Tar Mag arjun sayali chaitanya sakshi dance performance at engagement ceremony viral video
VIDEO: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली आणि चैतन्य-साक्षीने केला साखरपुड्यादिवशी मजेशीर डान्स; चाहते म्हणाले, “वेडे आहात तुम्ही”
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
Navri Mile Hitler La femme raqesh Bapat vallari viraj Sharmishtha Raut tejas desai dance on nacha ga ghuma song
Video: ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील एजे-लीलाचा ‘नाच गं घुमा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, सोबतीला होते निर्माते; पाहा व्हिडीओ
Tharla tar mag fame actress Ruchira Jadhav bought new car for mother and father
‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने आई-वडिलांना दिलं खास सरप्राइज, घेतला ‘सुवर्णरथ’
Diva staion Escalator Goes In Opposite Direction Suddenly Panics Commuters shocking video
दिवा स्टेशनवर ऐन गर्दीत सरकता जिना अचानक उलटा फिरला अन्…प्रवाशांनो ‘हा’ VIDEO एकदा बघाच
tula shikvin changalach dhada marathi serial saaniya chaudhari will enters in the show
अधिपतीची शिकवणी घेणार नव्या मास्तरीणबाई! मालिकेत ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री, अक्षराच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला

हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर लोकप्रिय अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो

चेतन आणि ऋजुता यांनी लग्नात एकमेकांसाठी हटके उखाणे घेतले. या दोघांनी घेतलेल्या उखाण्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. चेतन उखाणा घेत म्हणतो, “ठाण्याचे असतील तलाव फेमस पण, नाशिकची आमची नदीच; ऋजुताचं नाव घेतो आमचं ठरलं होतं आधीचं!”

हेही वाचा : Video : सातासमुद्रापार ‘नाच गं घुमा’! मुक्ता बर्वेचा परदेशात जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

“तिसरी घंटा झाली पडदा उघडला कायमचा, चेतनच्या सोबतीने सुरू करते नवा अंक संसाराचा!” असा सुंदर उखाणा ऋजुताने आपल्या नवऱ्यासाठी घेतला. दरम्यान, मराठी कलाविश्वातून सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.