‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘ठिपक्यांची रांगोळी’. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेल्या या मालिकेनं गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेतला. दोन वर्ष ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकेतील कानिटकर कुटुंबानं अल्पावधीतचं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या अशी मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचलं. त्यामुळे अजूनही या मालिकेतील कलाकार चर्चेत असतात. सध्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकार आता वेगवेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या मालिकेतील एक अभिनेत्री ‘स्टार प्लस’च्या नव्या हिंदी मालिकेत झळकणार आहे. या मालिकेच्या नव्या जबरदस्त प्रोमोमध्ये या अभिनेत्रीची दमदार एन्ट्री पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री ऋतुजा बागवे आणि अभिनेता अंकित गुप्ता यांची प्रमुख भूमिका असलेली ‘माटी से बंधी डोर’ मालिका ‘स्टार प्लस’ सुरू होणार आहे. २७ मे पासून संध्याकाळी ७.३० वाजता ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत अनेक मराठी चेहरे पाहायला मिळणार आहेत. यामधील एक चेहरा म्हणजे अभिनेत्री सारिका नवाथे.

हेह वाचा – Video: स्पृहा जोशीने आईबरोबर गायलं मोहम्मद रफी आणि आशा भोसलेचं ‘हे’ गाणं, सलील कुलकर्णींनी केलं कौतुक

‘ठिपक्यांच्या रांगोळी’ मालिकेत बाबी आत्याच्या भूमिकेत झळकलेली सारिका नवाथे आता ‘स्टार प्लस’च्या ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत वेगळ्या रुपात झळकणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सारिकाची दमदार एन्ट्री ट्रॅक्टरवरून होताना दिसत आहे. एका महत्त्वाच्या भूमिकेत सारिक नवाथे ‘माटी से बंधी डोर’ मालिकेत पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत ऋतुजा बागवे, सारिक नवाथे व्यतिरिक्त अभिनेता अमोल नाईक, अभिनेत्री रेशम श्रीवर्धन, मेघा घाडगे हे मराठी कलाकार झळकणार आहेत.

हेही वाचा – Video: ‘कलर्स मराठी’च्या ‘रमा राघव’ मालिकेनं ४०० भागांचा टप्पा केला पार, कलाकारांनी ‘असं’ केलं सेलिब्रेशन

हेही वाचा – Video: नम्रता संभेरावने मुक्ता बर्वेला वाढदिवसाच्या अशा काही दिल्या शुभेच्छा की अभिनेत्री गेली पळून, पाहा व्हिडीओ

सारिका नवाथेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं अनेक मराठी मालिका, चित्रपटात काम केलं आहे. याशिवाय तिनं हिंदी मालिकाविश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘माटी से बंधी डोर’ मालिकेपूर्वी तिनं बऱ्याच हिंदी मालिकेत देखील काम केलं आहे.