छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ गेल्या अनेक वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात घर गेले आहे. या मालिकेतील जेठालाल आणि दयाबेन ही जोडी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. या मालिकेतील मध्यवर्ती पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी आपली सहअभिनेत्री दिशा वाकानीबद्दल भाष्य केलं आहे.

या मालिकेत दयाबेन हे पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी २०१७ पासून मालिकेपासून लांब आहे. मालिकेचे चाहते डोळे लावून बसले आहेत. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दिलीप जोशी यांनी दिशाबद्दल वक्तव्य केलं आहे. ते दिशाह्या कमबॅकवर म्हणाले, “हा निर्णय पूर्णपणे निर्मात्यांवर आहे ते ठरवणार मालिकेत कोणी नवा चेहरा आणायचा की नाही पण एक कलाकार म्हणून मला दया ही भूमिका आजही आठवते. खूप काळ दया व जेठालाल हे पात्र रसिक प्रेक्षकांची एन्जॉय केलं.”

raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
BJP needs support from MNS A look at Raj Thackeray stance on participation in the Grand Alliance
भाजपला मनसेची साथ हवी ; महायुतीतील सहभागाबद्दल राज यांच्या भूमिकेकडे लक्ष
religious activities by bjp workers for victory of lok sabha candidate sudhir mungantwar
चंद्रपूर : विजयासाठी धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून देवालाच साकडे!
Vinesh Phogat Sakshi Malik message to PM narendra modi to keep people like Brijbhushan away
ब्रिजभूषणसारख्या व्यक्तींना दूर ठेवा; विनेश फोगट, साक्षी मलिकचे पंतप्रधानांना साकडे

‘तारक मेहता’मध्ये लवकरच परतणार दया भाभी; निर्मात्यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले “आता गरबा..”

ते पुढे म्हणाले, “ज्या दिवशी ती सोडून गेली तेव्हापासून विनोदी भाग कमी झाला आहे पण आम्ही कायमच सकारत्मक राहिलो. असितपण सकारात्मक आहेत त्यामुळे आम्हाला माहित नाही पुढे काय होणार ते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

मालिकेच्या निर्मात्यांनी नुकतीच टप्पू हे पात्र साकारण्यासाठी नव्या अभिनेत्याची निवड केली आहे. या भूमिकेसाठी निर्मात्यांनी नितीश भलूनीची निवड केली आहे. तर २०१७ मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर काही महिन्यांनी दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला.