Tmkoc Fame Talks About Mandar Chandwadkar : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा लोकप्रिय कॉमेडी शो नेहमी कुठल्या न कुठल्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. यामधील कलाकारांचाही खूप मोठा चाहतावर्ग असून यातील बरेच कलाकार सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतात. यापैकी एक म्हणजे मालिकेत आत्माराम भिडे ही भूमिका साकारणारा अभिनेता मंदार चांदवडकर. अशातच आता मालिकेतील त्यांच्या सहअभिनेत्याने त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या कार्यक्रमात काही कलाकारांची बाँडिंग पाहणं प्रेक्षकांनाही खूप आवडतं. त्यापैकी एक जोडी म्हणजे भिडे आणि टप्पू. मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता नितीश भालुनीने मंदार यांच्याबद्दल सांगितलं आहे. मंदार चांदवडकर त्याला कशाप्रकारे मदत करतात आणि त्यांचा बाँड कसा आहे याबद्दल त्याने अवेसम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

मंदार चांदवडकर यांनी दिलेला ‘हा’ सल्ला

मुलाखतीत मंदार यांच्याबद्दल नितीश म्हणाला, “मला सर्वात जास्त मज्जा भिडे हाऊसमध्ये शूटिंग करताना येते. मला मंदार सर आणि दिलीप सरांकडून खूप शिकायला मिळतं. आम्ही नवीन असताना सीन करताना इंप्रोवाईज करायचो नाही, पण आता मंदार सरांनी तुम्हाला काही सुचलं तर ते वाक्य घ्यायचे असे सांगितले आहे. फार तर फार काय होईल, नाही आवडलं तर हे सूट होत नाहीये असं म्हणतील; म्हणून आता मी सीन करताना इंप्रोवाइज करतो, माझ्या लाईन्स टाकतो.”

Award Banner

नितीशने यावेळी जेठालाल म्हणजे दिलीप जोशी व त्याच्यामधील बाँड कसा आहे असं विचारल्यानंतर तो म्हणाला, ““माझे ऑनस्क्रीन बाबा माझ्या ऑफस्क्रीन बाबांसारखेच आहेत. आमचं नातं गुरू शिष्यसारखं आहे. एकलव्यासारखं मी त्यांना म्हणत नाही की सर मला शिकवा वगैरे. शांत बसून ते जे करतात त्याचं निरीक्षण करत मी शिकतो. मी त्यांच्याकडून शिकत आहे हे ही मी दाखवत नाही, ते स्वत:मध्ये अभिनयाची संस्था आहेत.”

दरम्यान, नितीश भालुनीपूर्वी या कार्यक्रमात इतर दोन अभिनेत्यांनी टप्पूची भूमिका साकारली आहे. कार्यक्रम सुरू झाल्यापासून पुढे बरीच वर्ष भव्या गांधीने टप्पूची भूमिका साकारली. त्यानंतर राज अनादकटने काही वर्ष हे पात्र साकारलं; पण मालिकेतील त्याच्या एक्झिटनंतर आता नितीश भालुनी हे पात्र साकारत आहे.