TMKOC Shyam Pathak Family: तारक मेहता का उल्टा चष्मा ही लोकप्रिय विनोदी मालिक आहे. या मालिकेमध्ये पत्रकार पोपटलाल बऱ्याच वर्षापासून लग्नासाठी वधू शोधत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्यांनी २२ वर्षांपूर्वीच लग्नगाठ बांधली. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (NSD) श्यमा पाठक यांना खऱ्या आयुष्याची जोडीदार भेटली. त्यांच्या पत्नीचे नाव रेश्मी आहे आणि त्यांना तीन अपत्ये आहेत. एनएसडीने श्याम पाठक यांच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिथे शिकत असतानाच त्यांना त्यांच्या आयुष्यातील प्रेम आणि आयुष्यभराची जोडीदार रेश्मी भेटली.
एनएसडीमध्ये प्रवेश अन् रेश्मीशी भेट
श्याम पाठक इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामध्ये शिकत होते. अभिनेता व्हायचं असल्याने त्यांची शिक्षण सोडलं आणि एनएसडीमध्ये प्रवेश घेतला. तिथेच पाठक यांची रेश्मी नावाच्या तरुणीशी भेट झाली. ती त्यांच्याचबरोबर दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती शिकत होती.
प्रेमात पडले पण कुटुंबाचा विरोध
रेश्मी व श्याम पाठक प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. श्याम गुजराती आहेत, तर रेश्मी केरळची. सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी असल्याने कुटुंबीय हे नातं स्वीकारायला तयार नव्हते.
आर्य समाज मंदिरात केलं लग्न
श्याम पाठक यांना एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या कुटुंबाने हे नातं स्वीकारलं तरी रेश्मीचं कुटुंब स्वीकारणार नाही. मग त्यांनी एनएसडीमधील त्यांच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी आर्य समाज मंदिरात रेश्मीशी लग्न केलं. श्याम पाठक व रेश्मीचे कुटुंबीयलग्नाला उपस्थित नव्हते. पण आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी रेश्मी आणि श्याम यांनी कुटुंबाचा विरोध पत्करला.
एनएसडीमध्ये झालेलं रिसेप्शन
श्याम पाठक व रेश्मी यांच्या लग्नाला एनएसडीचे सहकारी आणि प्राध्यापक उपस्थित राहिले होते. त्यांचे रिसेप्शनदेखील एनएसडीमध्येच झाले नव्हते. श्याम पाठक व रेश्मी यांनी लग्न १ जून २००३ रोजी लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाला २२ वर्षे झाली आहेत आणि ते आनंदाने संसार करत आहेत. त्यांना एक मुलगी, नियती आणि दोन मुलं, पार्थ पाठक आणि शिवम पाठक आहेत.
