scorecardresearch

तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत, कारण…

पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले

तुनिषा शर्मावर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत, कारण…
फोटो : सोशल मीडिया

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने मनोरंजनविश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. तिने मालिकेच्या सेटवर गळफास लावून जीवन संपवलं. तुनिषा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केलंय. तुनिषाच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. नुकतंच त्याचा अहवाल समोर आला आहे.

शिवाय तुनिषाच्या घरच्यांनीही शिझान खानवर आरोप केले आहेत. यावर आता पोलिसांनी केलेला खुलासा समोर आला आहे. रात्रीच तुनिषाच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम झालं आहे, त्याचा रिपोर्ट अद्याप आलेला नसला तरी पोलिसांनी हातात असलेल्या माहितीवरून तुनिषा गरोदर नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सध्या व्हिसेरा जतन करण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप याचा अहवाल समोर आलेला नाही. आज सकाळीच तुनिषाचा मृतदेह तिच्या घरच्यांच्या सुपूर्त करण्यात येणार होता आणि आजच तिच्यावर अंतिम संस्कार पार पडणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

आणखी वाचा : तुनिषा शर्मा खरंच गरोदर होती का? पोस्टमार्टमनंतर पोलिसांचा मोठा खुलासा

‘अमर उजाला’च्या वृत्तानुसार नवीन अपडेटमध्ये पोलिसांकडून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढची कारवाई होईल असं स्पष्ट झालं आहे त्यामुळे निदान आजतरी तुनिषावर अंतिम संस्कार होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. हातात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार तुनिषाच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळलेल्या नसून गळफास लावल्यावर श्वास घेण्यास त्रास झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

एवढंच नाही तर गेल्या २४ तासांत तुनिषा फोनवर किंवा सेटवर कोणाकोणाशी बोलली त्या सगळ्यांचे जबाब नोंदवले जाट असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सध्या सब टीव्ही मालिका ‘अली बाबा: दास्तान-ए-काबुल’मध्ये तुनिशा राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी २: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग ३’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. तुनिषाने ‘फितूर’ आणि ‘बार बार देखो’ मध्ये तरुण कतरिना कैफची भूमिका साकारली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 12:52 IST

संबंधित बातम्या