अभिनेत्री सुश्मिता सेन लवकरच ताली या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच याचा पहिला लूक समोर आला आहे. यात सुश्मिता ही ट्रान्सवूमन गौरी सावंत यांची भूमिका साकारत आहे. तृतीयपंथी लोकांसाठी झटणारी, त्यांच्यासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून गौरी सावंत यांना ओळखले जाते. नुकतंच गौरी सावंत यांनी त्यांच्या वडिलांबद्दल प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्या भावूक झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गौरी सावंत यांनी नुकतंच झी मराठीवरील बस बाई बस या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांना रोखठोक शब्दात उत्तर दिली. या कार्यक्रमादरम्यान त्यांना सहप्रवाशी म्हणून त्यांच्या वडिलांचा फोटो दाखवण्यात आला. त्यावेळी गौरी या प्रचंड भावूक झाल्या. हा फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला त्या शांत बसल्या होत्या. त्यानंतर त्यांनी भावूक होत त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली.
आणखी वाचा : “मी तुमच्या गटाचा…” एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यानंतर अवधूत गुप्तेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

गौरी सावंत काय म्हणाल्या?

“दादा, तुमच्याशी काय बोलू… मला हिंमत होणार नाही. पण मला एवढंच सांगावंस वाटेल दादा या शब्दात प्रेम आहे आणि तुमच्यासारखा बाप मला कधीच कोणी मिळाला नाही. मी नकळतपणे अजानतेपणे कधी तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा आणि आज मी हक्काने सांगते की मी तुमचं लेकरु आहे, कोकरु आहे. मला त्याचा अभिमान आहे.

मी आयुष्यात तुम्हाला आई गेल्यानंतर पहिल्यांदा रडताना बघितलं होतं. त्यानंतर माझ्यासाठी. मी तुमच्या किती जवळची होती हे मला माहिती होते. माझ्या हातून चुका झाल्या असतील, कधीही न सुधारण्यासारख्या त्या चुका असतील आणि आज संपूर्ण दुनिया माझ्याबरोबर असून सुद्धा मी तुमच्या दोघांशिवाय शून्य आहे. माझ्यासारखं दुसऱ्या कोणत्याच गौरीच्या वाट्याला हे येऊ नये, असे गौरी सावंत म्हणाल्या. यानंतर त्यांनी मी तरी उतरते नाही तर तुम्ही तरी उतरा आता या बसमधून “, असेही भावूक शब्दात म्हटले.

आणखी वाचा : Taali : “एखादा दाक्षिणात्य अभिनेता…” सुश्मिता सेनचा लूक पाहून गौरी सावंतची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान नुकतंच सुश्मिता सेनने तिच्या इन्स्टाग्रामवर आगामी वेब सीरिज ‘ताली’चा लूक शेअर केला आहे. यात ती म्हणाली, “ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! या सुंदर व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारण्याचं आणि तिची कथा जगासमोर आणण्याचा भाग्य मला मिळालं यापेक्षा अभिमानास्पद काहीच नाही. मी कृतज्ञ आहे की मला ही संधी मिळाली. इथे आपलं आयुष्य सन्मानाने जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. खूप सारं प्रेम.” या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांच्या खांद्यावर असणार आहे. ही वेब सीरिज वूट सिलेक्ट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे. या वेबसीरिजचे एकूण ६ एपिसोड असणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transgender gauri sawant cry after watch father photo in bus bai bus nrp
First published on: 07-10-2022 at 15:00 IST