scorecardresearch

Premium

Video : ‘तू चाल पुढं’मध्ये वैरी तर ऑफस्क्रीन ‘असा’ आहे बॉण्ड, धनश्री काडगावकरच्या लेकाचा अन् दीपा चौधरीचा व्हिडीओ चर्चेत

Video : दीपा चौधरी अन् धनश्री काडगावकरच्या लेकाचा गोड व्हिडीओ व्हायरल…

deepa chaudhari gave special gift to dhanashri kadgaonkar son kabir
दीपा चौधरी आणि धनश्री काडगावकरच्या लेकाचा व्हिडीओ पाहिलात का?

‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री धनश्री काडगावकरने वहिनीसाहेब हे पात्र साकारलं होतं. या भूमिकेमुळे अभिनेत्री घराघरांत लोकप्रिय झाली. यानंतर सध्या ‘तू चालं पुढं’ या मालिकेतून धनश्री प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नव्या मालिकेतही अभिनेत्री नकारात्मक ‘शिल्पी’ची भूमिका साकारत आहे. तिने नुकत्याच शेअर केलेल्या सोशल मीडिया पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : “शाळेत उंचीमुळे मला…”, ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला, “आज तुमच्यासमोर सुवर्णपदक…”

Photographers hair burning wedding video viral on social media s
स्टंटबाजी करणं भोवलं! फोटोग्राफरच्या केसांना आग; लग्नातील थरारक VIDEO व्हायरल
a punekar young man told ukhana for wife and mention the name of Shreemant Dagdusheth Halwai Ganpati
Pune Video : “…नाव घेतो श्रीमंत दगडूशेठ की जय” पुणेकर तरुणाने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Rohit Sharma angry video in IND vs ENG 3rd test in rajkot
IND vs ENG 3rd Test : सरफराजच्या धावबादनंतर रोहित शर्मा जडेजावर संतापला, VIDEO होतोय व्हायरल
youth stunt running vehicle pimpri
पिंपरीत धावत्या गाडीच्या टपावर बसून तरुणाची स्टंटबाजी; तरुणाचा पोलीस घेत आहेत शोध!

मालिकेतील शिल्पी अश्विनी विरोधात अनेक कट कारस्थानं रचताना दिसते. परंतु, खऱ्या आयुष्यात धनश्री आणि दीपा चौधरी या दोन्ही अभिनेत्रींमध्ये फार सुंदर नातं आहे. दीपा चौधरीसाठी धनश्रीने अलीकडेच एक खास पोस्ट शेअर केली आहे. दीपाने धनश्रीचा मुलगा कबीरसाठी खास गिफ्ट आणलं होतं. याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून, दीपाचे आभार मानले आहेत.

हेही वाचा : “‘सत्याची’ ताकद व्हती”, किरण मानेंची गांधी जयंतीनिमित्त पोस्ट; म्हणाले, “यांच्या हजार पिढ्या…”

धनश्री काडगावकरची पोस्ट

एके दिवशी आउटडोर शूट चालू होतं आमचं…
कबीर मला भेटायला आला कारण शूटवर जाताना मी प्रॉमिस केलं होतं की मी एबीसीडीचा गेम पाठवून देईन..
तो सेट वर आला आणि आमच बोलणं दीपा ताईने ऐकलं.. तिने कसं कधी जाऊन तिथल्या जवळच्या दुकानातून कबीरसाठी हे आणलं कळलं पण नाही..

तिला खूप आवडतं लोकांना गिफ्ट्स द्यायला आणि त्याही पेक्षा मला असं वाटतं कि हे एक छोटं gesture आहे प्रेम व्यक्त करण्याचं ..
आणि ते त्या त्या वेळी जमणं ही एक सुंदर कला आहे ..

इतका खेळला आहे तो या abcd सोबत .. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं सांगणारा आहे ..
Thank u दीपा चौधरी माऊ
गिफ्ट खूप आवडलं आणि त्या ही पेक्षा जास्त तुझं gesture ..
अशीच राहा…

हेही वाचा : सायलीचा जीव अर्जुन कसा वाचवणार? जुई गडकरीने शेअर केला ‘ठरलं तर मग’चा नवा प्रोमो

दरम्यान, धनश्री-कबीर या मायलेकांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या दीपाने कबीरला दिलेल्या सुंदर गिफ्टचं आणि दोन्ही अभिनेत्रींमध्ये असलेल्या ऑफस्क्रीन बॉण्डिंगचं नेटकरी कौतुक करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tu chaal pudha fame actress deepa chaudhari gave special gift to dhanashri kadgaonkar son kabir sva 00

First published on: 02-10-2023 at 15:22 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×