Tu Hi Re Maza Mitwa Promo : स्टार प्रवाहवरील ‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करीत आहे. मालिकेत येणारे नवनवीन ट्विस्ट आणि अर्णव-ईश्वरीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत नुकत्याच एका भागात अर्णवच्या गरोदर असलेल्या बहीणीचा (अंजली राजेशिर्के) आणि ईश्वरीचा अपघात झाल्याचे पाहायला मिळालं. या अपघातातून ईश्वरीनं अंजलीला वाचवलं.

आपल्या गरोदर बहिणीला बायकोने वाचवल्याबद्दल अर्णवच्या मनात ईश्वरीविषयी प्रेम तर वाटत आहे, पण एका गैरसमजामुळे दोघांच्या नात्यात जरा तणाव असल्याचं पाहायला मिळत आहे. अर्णवच्या मनात असलेलं प्रेम त्यानं व्यक्त करावं, यासाठी ईश्वरी तिच्याबाजूने प्रयत्न करीत आहे.

अशातच मालिकेचा एक हटके प्रोमो समोर आला आहे. अपघातात ईश्वरीच्या हाताला दुखापत झाल्यानं माणुसकी म्हणून अर्णव तिला मदत करतांना दिसत आहे. प्रोमोमध्ये दाखवल्यानुसार, एक व्यक्ती त्याच्या पत्नीला मिस इंदौर म्हणून हाक मारतो. मात्र तो व्यक्ती ईश्वरीलाच मिस इंदौरलाच म्हटल्याचे समजून अर्णव त्याच्यावर रागावतो. अर्णव त्या व्यक्तीची कॉलर पकडत त्याला “माझ्या बायकोला फक्त मीच मिस इंदौर म्हणतो” असं सुनावतो. तेवढ्यात त्या व्यक्तीची बायको येते आणि अर्णवला तो मला मिस इंदौर म्हणत असल्याचे सांगते. यानंतर अर्णव त्याची माफी मागतो.

‘तू ही रे माझा मितवा’ नवा प्रोमो

अर्णवनं न दाखवता व्यक्त केलेलं हे प्रेम पाहून ईश्वरीसुद्धा खुश होते आणि त्याला म्हणते, “बायको म्हणून या मिस इंदौरचा कॉपीराईट फक्त तुमचाचं आहे”. मालिकेचा हा प्रोमो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. ‘किती गोड’, ‘कमाल’, ‘तू ही रे माझा मितवा’, ‘ईश्वरी-अर्णवमधला हा गैरसमज लवकरच संपू दे’ या आणि अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी या प्रोमोखाली व्यक्त केल्या आहेत. येत्या २ फेब्रुवारी रोजी हा खास भाग प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

दरम्यान, अर्णव-ईश्वरी या केमिस्ट्रीमुळेच मालिका रेटिंगमध्ये टॉप २ मध्ये आहे. सुरवातीला ही मालिका रात्री उशिरा प्रसारित व्हायची. मात्र प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे मालिकेला प्राइम स्लॉट मिळाला. यानंतर मालिकेच्या लोकप्रियतेच आणखीनच वाढ झाली आहे.