अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनात ‘पुष्पा २’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘पुष्पा २’ चित्रपटातील “अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामी” हे गाणं मे महिन्याच्या अखेरिस प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. “अंगारों…” गाणं सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ट्रेंड होत आहे. या गाण्यावर मोठमोठ्या सेलिब्रिटींनी रील व्हिडीओ बनवले आहेत. अगदी मराठी कलाविश्वातील कलाकारांना सुद्धा या गाण्यावर रील व्हिडीओ बनवण्याचा मोह आवरता आलेला नाही.

हेही वाचा : TRP च्या शर्यतीत टॉप ५ मध्ये असणारी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! ‘ठरलं तर मग’ पुन्हा अव्वल, तर दुसऱ्या स्थानी…

ऐश्वर्या व अविनाश नारकर, स्वाती व तुषार देवल, ‘पारू’ मालिकेतील कलाकार, अभिनेत्री स्पृहा जोशी असे सगळे कलाकार गेल्या काही दिवसांत “अंगारों…” गाण्यावर थिरकले आहेत. आता यावर ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगावकर सुद्धा थिरकली आहे. “फायनली ऑन द ट्रेंड” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.

धनश्रीने या व्हिडीओमध्ये पांढऱ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. “सुपर..”, “वाह रे सामी”, “सुंदर लूक” अशा प्रतिक्रिया युजर्सनी धनश्रीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : Video : रश्मिका मंदानाला ‘या’ मराठमोळ्या चिमुकलीचं लागलं वेड, ‘पुष्पा २’ चित्रपटातील गाणं गात केलेला डान्स पाहून अभिनेत्री म्हणाली…

हेही वाचा : Video : गेली दोन वर्षे प्रेक्षक वाट पाहत असलेला क्षण अखेर येणार, ‘तुझेच मी गीत गात आहे’च्या महाअंतिम भागात घडणार ‘ही’ गोष्ट

दरम्यान, छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये आजही लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. यामध्ये अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. याच मालिकेतून अभिनेत्री धनश्री काडगावकर प्रसिद्धी झोतात आली. तिने यामध्ये ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका साकारली होती. यानंतर ती ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तू चाल पुढे’ या मालिकेत झळकली होती. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.