Hardeek Joshi and Dhanashri Kadgaonkar Reunion: हार्दिक जोशी व धनश्री काडगावकर हे दोन्ही लोकप्रिय कलाकार आहेत. दोघांनाही तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून लोकप्रियता मिळाली होती. झी मराठी वाहिनीवर २०१६ ला ही मालिका प्रदर्शित झाली होती.
या मालिकेत हार्दिक जोशी, अक्षया देवधर, धनश्री काडगावकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. हार्दिकने राणा दा, अक्षयाने अंजली बाई आणि धनश्रीने वहिनीसाहेब ही भूमिका साकारली होती. आता हार्दिक जोशी व धनश्री काडगावकर हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत.
“लवकरच प्रेक्षकांना सरप्राइज….”
हार्दिक व धनश्रीने नुकतील ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत हार्दिक म्हणाला, “लवकरच प्रेक्षकांना सरप्राइज मिळणार आहे. कदाचित आम्ही दोघे एका स्क्रीनवर दिसू. एका वेगळ्या पद्धतीने, एका वेगळ्या भूमिकेत असू. आता ती भूमिका काय व कशी असेल हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.”
हार्दिकच्या या वक्तव्यानंतर त्यांना विचारले की तुम्ही मालिकेतच दिसणार आहात का? त्यावर हार्दिक म्हणाला, “हे सुद्धा सरप्राइज आहे.” धनश्री म्हणाली, “खरंतर काही दिवसांपूर्वी याबद्दल आम्ही छोटी हिंट दिली होती, त्यावरून लोक अंदाज लावू शकतात.” आता हार्दिक व धनश्री कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
धनश्री सध्या घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे. तिने शर्वरी ही भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले.
हार्दिकने मालिकांसह सिनेमातही काम केले आहे. प्रेक्षक त्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहायला उत्सुक आहेत. आता राणा दा आणि वहिनीसाहेब यांची जोडी काय कमाल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अक्षयाच्या कामाबद्दल बोलायचे तर ती सध्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करत आहे. तिने यामध्ये भावना ही भूमिका साकारली आहे.
