छोट्या पडद्यावरच्या अनेक ऑनस्क्रीन जोड्या गेल्या काही वर्षांत खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याचं आपण पाहिलं आहे. शिवानी सुर्वे – अजिंक्य ननावरे, तितीक्षा तावडे – सिद्धार्थ बोडके, हार्दिक जोशी – अक्षया देवधर अशा बऱ्याच कलाकार मंडळींनी आधी मालिकेत ऑनस्क्रीन एकत्र काम करून त्यानंतर आपल्या वैवाहिक आयुष्याची घडी बसवली.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर घराघरांत लोकप्रिय झाले. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मालिकेमुळे या दोघांना सर्वत्र राणादा अन् पाठकबाई अशी ओळख मिळाली. आज मालिका संपल्यावरही जागोजागी या जोडप्याला मालिकेतल्या नावानेच ओळखलं जातं. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर पुढे काही महिन्यांनी सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर करत हार्दिक – अक्षयाने त्यांच्या असंख्य चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. मे २०२२ मध्ये साखरपुडा झाल्यावर जवळपास सहा महिन्यांनी म्हणजेच २ डिसेंबर २०२२ मध्ये हे जोडपं लग्नबंधनात अडकलं.

video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
prasad jawade and amruta deshmukh dances on shahid kapoor song
२१ वर्षांनी पुन्हा ‘इश्क विश्क’! शाहिदच्या गाण्यावर प्रसाद जवादे अन् अमृता देशमुखचा जबरदस्त डान्स, सर्वत्र होतंय कौतुक
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
virat kohli daughter vamika biggest concern after India won t20 worldcup
“खेळाडूंना रडताना पाहून…”, भारताच्या विजयानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट! विराटच्या लेकीला वाटली याबद्दल काळजी
hardeek joshi and akshaya deodhar
हार्दिक-अक्षया पोहोचले अक्कलकोटला! राणादाने देवदर्शन घेऊन शेअर केला फोटो, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक
Did you ever notice this mistake in Navra Mazha Navsacha movie
Video: ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटातील ‘ही’ चूक कधी तुम्हाला लक्षात आली का? व्हिडिओ होतोय व्हायरल

हेही वाचा : JNU Trailer : विद्यार्थ्यांमधील संघर्ष, राजकारण अन्…; ‘जेएनयू’चा ट्रेलर प्रदर्शित, तितीक्षा तावडेचा पती मुख्य भूमिकेत

हार्दिक-अक्षया सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. विविध ट्रेडिंग गाण्यांवर ते दोघेही व्हिडीओ बनवत असतात. सध्या मनोरंजनविश्वात ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. लहान मुलांपासून ते मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सगळ्यांनीच या गाण्यावर ठेका धरल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. आता या लोकप्रिय गाण्यावर हार्दिक – अक्षया देखील थिरकले आहेत.

हार्दिक जोशीच्या नवीन हेअरस्टाइलने या व्हिडीओमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राणादाचा या व्हिडीओमध्ये नेहमीपेक्षा काहीसा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. अक्षयाने या व्हिडीओला “आम्ही ट्रेंड फॉलो करतोय…” असं कॅप्शन दिलं आहे. नेटकऱ्यांनी हार्दिक-अक्षयाने ‘पुष्पा २’च्या गाण्यावर ठेका धरल्याचं कौतुक केलंच पण, यामध्ये सर्वांचं लक्ष हार्दिकच्या हेअरस्टाइलने वेधून घेतलं.

हेही वाचा : आई तशी लेक! अनुष्का शर्मा अन् साडेतीन वर्षांच्या वामिकाने पाटीवर रेखाटलं चित्र, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

“वॉव दादा दोघांचीही हेअरस्टाइल मस्त”, “अहा दादा हेअरस्टाइल”, “हार्दिक हेअरस्टाइल मस्तच”, “राणादा जोरात”, “राणादा न्यू लूक” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. दरम्यान, ‘पुष्पा २’बद्दल सांगायचं झालं, तर गेल्या काही दिवसांत या चित्रपटाने भारतभर एक वेगळीच क्रेझ तयार केली आहे. हा चित्रपट सुरुवातीला १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. परंतु, काही कारणास्तव ‘पुष्पा २’चं प्रदर्शन लांबवणीवर पडलं आहे. आता हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.