Tula Japnar Aahe Fame Mahima Mhatre New Home : आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. गेल्या काही महिन्यात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. जुई गडकरी, संतोष पाटील, वनिता खरात यांच्या नव्या घराची झलक नुकतीच चाहत्यांना मिळाली. आता मालिकाविश्वातील आणखी एका लोकप्रिय अभिनेत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘तुला जपणार आहे’ ही थ्रिलर मालिका सुरू झाली. यामध्ये लोकप्रिय अभिनेत्री महिमा म्हात्रे प्रमुख भूमिका साकारत आहे. महिमा साकारत असलेल्या पात्राचं नाव आहे मीरा. रात्री उशिरा प्रसारित होऊनही या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात आहे. महिमालाही गेल्या वर्षभरात प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे.

अभिनेत्रीने नुकतीच तिच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. महिमा म्हात्रेने आपल्या आई-बाबांसह सुंदर अशा नव्या बंगल्यात गृहप्रवेश केला आहे. नुकतीच त्यांच्या नव्या घरी गृहप्रवेश व वास्तूशांती पूजा पडली. यासाठी अभिनेत्री सुंदर साडी नेसून तयार झाली होती. याशिवाय नव्या घराच्या प्रवेशद्वारजवळ म्हात्रे कुटुंबीयांनी छान रांगोळी काढली होती. अभिनेत्रीने या नव्या घरात अवॉर्ड्स ठेवण्यासाठी खास कॉर्नर डिझाइन करून घेतला आहे. याठिकाणी महिमाने तिचे झी मराठीचे अवॉर्ड्स ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

गृहप्रवेशाच्या दिवशी अभिनेत्रीचा संपूर्ण बंगला सजवण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिमाचे इंडस्ट्रीतील जवळचे मित्रमंडळी सुद्धा उपस्थित होते. याचे फोटो अन् व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

mahima mhatre new home
महिमा म्हात्रेचं नवीन घर
zee marathi
महिमाच्या घरी ‘झी मराठी’च्या अवॉर्ड्ससाठी खास जागा

दरम्यान, महिमा म्हात्रेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर यापूर्वी तिने ‘खुमासदार नात्याचा गोडा मसाला’, ‘दार उघड बये’, ‘आई मायेचं कवच’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तर तिच्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत प्रतीक्षा शिवणकर, नीरज गोस्वामी, आधिकी कसबे, मिलिंद फाटक, शर्वरी लोहकरे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.