Tula Japnar Ahe fame actors dance: कलाकार जितके अभिनयाच्या माध्यमातून भेटीला येतात, तितकेच ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येतात. अगदी सामान्यांपासून ते जगातील नामांकित व्यक्तींपर्यंत जवळजवळ सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. आता ‘तुला जपणार आहे’ या मालिकेतील कलाकारही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला जपणार आहे’ या मालिकेचा मोठा प्रेक्षकवर्ग आहे. मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. मालिकेत मंजिरी ही चेटकीण असल्याचे पाहायला मिळते. तिला चिरतारुण्य हवे आहे, त्यासाठी तिला माणसांचे बळी द्यायचे आहेत. या सगळ्यासाठी तिने मीराच्या आईला आणि बहिणीला मारले आहे. मात्र, त्या आत्माच्या रूपाने मीरा, मंजिरीसमोर येतात.
मीराची मृत बहीण तिला दिसते. ती तिला वेळोवेळी मदत करते. अशा सगळ्या गोष्टींमुळे मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येतात. मीरा व अंबिका या बहिणींची जोडी मंजिरीला वेळोवेळी सामोऱ्या जातात. मंजिरीही त्यांच्या विरोधात सतत कट कारस्थाने करते. या सगळ्यात मालिकेतील इतर पात्रेही कायमच लक्ष वेधून घेत असतात.
‘तुला जपणार आहे’ फेम कलाकारांचा भन्नाट डान्स
आता मालिकेतील काही कलाकार एका डान्स व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. मालिकेत अनन्या ही भूमिका साकारणाऱ्या तनिष्काने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्याबरोबर मालिकेतील इतर कलाकारही दिसत आहेत. चेतन गुरव, मिलिंद पाठक, प्रतीक्षा शिवणकर, पूर्णिमा तळवलकर या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या सगळ्यांनी गल्ला गुडिया (Gallan Goodiyaan) या गाण्यावर डान्स केला आहे. त्यांची एनर्जी, त्यांचा उत्साह आणि चेहऱ्यावरील आनंद लक्ष वेधून घेत आहे. तसेच, सगळ्यांनी गुलाबी रंगाच्या शेडचे कपडे घातल्याचे पाहायला मिळत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना तनिष्काने हाऊस पार्टी असे लिहिले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. विजया बाबर, शर्वरी लोहोकरे, विकास पाटील, अविनाश नारकर अशा अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. विकास पाटीलने मिलिंद पाठकला टॅग करत लिहिले, “तुम्ही मेन डान्सरला बॅकराऊंडला ठेऊन चूक केली”, अविनाश नारकर यांनी लिहिले, “वाह! एकदम भारी कडक,” तर चाहत्यांनीसुद्धा या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.



दरम्यान, मालिकेत आता नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
