Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या भुवनेश्वरी ( खोटी चारुलता ) आणि चारुहास यांच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. अक्षराला संपूर्ण सूर्यवंशी कुटुंबासमोर वेडं ठरवून भुवनेश्वरी तिची रवानगी रुग्णालयात करते. अक्षरावर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार नसतं. तिला झोपेचं इंजेक्शन दिलं जातं, या सगळ्यामुळे मास्तरीण बाईंची तब्येत आणखी खालवते. शेवटी अक्षरा मोठ्या धीराने भुवनेश्वरीचं सत्य संपूर्ण सूर्यवंशी कुटुंबीयांसमोर आणण्याचा निर्धार करते.

अक्षरा तिच्या मैत्रिणीच्या मदतीने एक फोन स्वत: जवळ ठेवून घेते आणि जसा तिच्या हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये बजरंग येतो, तेव्हा सावधपणे ती सगळ्या गोष्टींचं रेकॉर्डिंग करते. यामुळे अक्षराकडे एक प्रबळ पुरावा तयार होतो. त्यामुळे ती अधिपतीकडे हट्ट करते की, बाबा आणि चारुलता यांचं लग्न थांबवलं पाहीजे पण, दुसरीकडे चारुलता चारुहासला सांगते की, अक्षराची तब्येत बघता लग्नाचा मुहूर्त अलिकडचाच घेतला पाहीजे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana verification process
Ladki Bahin Scheme Scrutiny: सत्ता येताच, लाडकी बहीण…

हेही वाचा : Video : कोकणात पार पडला मराठी अभिनेत्याचा विवाहसोहळा! लग्नानंतर पत्नीचं बदललं नाव…; उखाणा घेत म्हणाला…

भुवनेश्वरीचं रुप घेऊन आलेल्या खोट्या चारुलताने लग्नाचा घाट घातल्याची माहिती अक्षराला समजते. तसा नर्सचा गणवेश घालून अक्षरा रुग्णालयातून पळ काढते. यादरम्यान, रुग्णालयातील इतर कर्मचारी सुद्धा तिचा पाठलाग करतात पण, अक्षराला पळून जाण्यात यश येतं. आता नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात अक्षरा थेट चारुहासचं लग्न थांबवण्यासाठी मांडवात पोहोचल्याचं पाहायला मिळतं. सर्वांसमोर भुवनेश्वरीच चारुलता आहे हे उघड करण्यासाठी अक्षरा आपली बाजू मांडण्यास सुरुवात करते. सुनेने दाखवलेल्या पुराव्यांमुळे चारुहासच्या पायाखालची जमीन सरकते. सर्वांसमोर मोठ्या स्क्रीनवर अक्षरा बजरंग आणि भुवनेश्वरीचा प्लॅन उघड करते.

अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही चारुलता आई नाही, भुवनेश्वरी मॅडम आहात शपथ घ्या असं ती सासूला सांगते. अधिपतीवरचं प्रेम आणि अक्षराजवळ असलेले पुरावे लक्षात घेऊन भुवनेश्वरी चारुहासची माफी मागते. मात्र, आता मालिकेत सर्वात मोठा ट्विस्ट येणार आहे.

हेही वाचा : “अंगारो सा…”, अल्लू अर्जुन अन् रश्मिकाचा ‘सुसेकी’ गाण्यावर जबरदस्त डान्स! पुष्पा-श्रीवल्लीची केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले…

अक्षरा आणि चारुहास भुवनेश्वरीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन तिला पोलिसात द्यायचा निर्णय घेतात. यावेळी अधिपती या सर्व गोष्टी पहिल्यापासून माहीत असल्याचं मान्य करतो. या सगळ्यामुळे अक्षरा सर्वांसमोर प्रचंड भावुक होणार आहे. यानंतर अक्षरा आणि अधिपती यांच्यात जोरदार वाद होऊन, अक्षरा आता सूर्यवंशींचं घर सोडण्याचा निर्णय घेणार आहे. आता अक्षरा खरंच घर सोडून जाईल का? अधिपतीने हे सत्य अक्षरापासून लपवण्यामागचं खरं कारण काय असेल? हे येत्या २ डिसेंबरला ( Tula Shikvin Changalach Dhada) प्रेक्षकांसमोर येणार आहे.

Story img Loader