Tula Shikvin Changalach Dhada Fame Marathi Actress : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या दीड वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय. अक्षरा, अधिपती, चारुहास या सगळ्या पात्रांचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. याशिवाय या मालिकेत खलनायिकेच्या भूमिका साकारणार्‍या भुवनेश्वरी, दुर्गेश्वरी आणि चंचला या सुद्धा घराघरांत लोकप्रिय झाल्या आहेत. यापैकी चंचलाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत ‘चंचला’ हे पात्र अभिनेत्री विरीशा नाईक साकारत आहे. खऱ्या आयुष्यात ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. याबाबत तिने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. या पोस्टला विरीशाने ‘आनंदाची बातमी’ असं कॅप्शन दिलं आहे. आता विरीशा कोणाशी लग्न करतेय असा प्रश्न तिच्या अनेक चाहत्यांच्या मनात निर्माण झाला असेल. त्याचंही उत्तर समोर आलं आहे.

aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
Ruhi Chaturvedi blessed with baby girl
एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Premachi Goshta Fame Rajas Sule went on trip to new zealand with wife after wedding 19 days
लग्नाच्या १९ दिवसांनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेता ‘या’ देशात गेला फिरायला, पत्नी फोटो शेअर करत म्हणाली…

हेही वाचा : ५ वर्षांचा प्रवास अखेर थांबला! ‘आई कुठे काय करते’ मालिका संपली, मधुराणीसह सगळेच कलाकार भावुक, वाचा पोस्ट

विरीशाचा होणारा पती सुद्धा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचं नाव आहे प्रशांत निगडे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि नाट्य निर्माता म्हणून प्रशांत ओळखला जातो. यापूर्वी त्याने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘स्वाभिमान’ मालिकेत ‘बबन’ ही भूमिका साकारली होती. सध्या तो ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेत ‘रॉकेट’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. आता प्रशांतला त्याच्या खऱ्या आयुष्यातली लक्ष्मी ही विरीशाच्या ( चंचला/चंची ) रुपात मिळाली आहे. या दोघांचा साखरपुडा ऑगस्ट महिन्यात पार पडला होता. आता दोघंही विवाहबंधनात अडकणार आहेत.

प्रशांत आणि विरीशा यांनी एका नाटकात मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ’ नाटकात दोघंही नवरा-बायकोची भूमिका साकारत आहेत. आता ही रील जोडी खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधण्यास सज्ज झाली आहे.

हेही वाचा : नव्या मालिकांची नांदी! ‘झी मराठी’वर सुरू होणार ‘ही’ थ्रिलर मालिका; जबरदस्त VFX ने वेधलं लक्ष, पाहा पहिली झलक

Prashant nigade and virishanaik
तुला शिकवीन चांगलाच धडा फेम चंचला म्हणजे विरीशा नाईक (Tula Shikvin Changalach Dhada ) व प्रशांत निगडे ( फोटो सौजन्य : Prashant nigade and virishanaik )

दरम्यान, लग्नाची आनंदाची बातमी शेअर करताच नेटकऱ्यांसह चाहत्यांनी विरीशा ( Tula Shikvin Changalach Dhada ) आणि प्रशांत या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Story img Loader