Tula Shikvin Changalach Dhada New Promo : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या चारुलता आणि चारुहास यांच्या लग्नाचा सीक्वेन्स चालू आहे. मात्र, चारुलताच्या रुपात घरात वावरणारी बाई ही अधिपतीची खरी आई नसून भुवनेश्वरी असल्याचं अक्षराचं ठाम म्हणणं असतं. पण, तिच्यावर विश्वास ठेवण्यास कोणीही तयार होत नाही. परिणामी, भुवनेश्वरी सुनेची रवानगी मानसिक रुग्णालयात करते. याठिकाणी तिला वेडं ठरवण्यासाठी अनेक कट-कारस्थानं रचली जातात. पण, अक्षरा मुळातच हुशार असते. जवळच्या मैत्रिणीला बोलवून ती एक नवा प्लॅन बनवते.

एकीकडे अक्षरा रुग्णालयात असताना दुसरीकडे सूर्यवंशी कुटुंबीयांच्या घरात चारुलता आणि चारुहासच्या लग्नाची जंगी तयारी सुरू असते. हे लग्न काही करून थांबवायचं असं अक्षरा ठरवते. यासाठी तिला पुरावे गोळा करायचे असतात. मैत्रिणीचा फोन अक्षरा उशीमध्ये लपवून स्वत:कडे ठेवते. ज्यावेळी अक्षराला त्रास देण्यासाठी बजरंग येतो. ती आधीच मोठ्या हुशारीने सावध होते आणि फळांमागे आपला मोबाइल लपवून ठेवते. व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू असताना या सगळ्या कारस्थानामागे भुवनेश्वरी आहे असं बजरंगकडून वदवून घेण्याचा अक्षरा प्रयत्न करत असते.

Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
amazing magic of the students of the Zilla Parishad school
पडदा पडताच गायब झाला चिमुकला! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची भन्नाट जादू पाहून मनापासून हसाल! Viral Video बघाच
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”

हेही वाचा : अमेरिका सोडून माधुरी दीक्षित मायदेशी काय परतली? म्हणाली, “माझे आई-बाबा आणि दोन्ही मुलं…”

शेवटी आता भर मांडवात येऊन अक्षरा चारुलता आणि चारुहासचं लग्न थांबवणार आहे. अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही चारुलता आई नाही, भुवनेश्वरी मॅडम आहात शपथ घ्या असं ती सासूला सांगते. अधिपतीवरचं प्रेम आणि अक्षराजवळ पुरावे लक्षात घेऊन आता लवकरच भुवनेश्वरी चारुहासची माफी मागणार आहे.

भुवनेश्वरी म्हणते, “माफ करा आम्ही चारुलता बाईंचं सोंग घेऊन इथे आलो.” यावर चारुहास म्हणतो, “तुझी लायकी नाहीये तिचं नाव घेण्याची…माझं चारुचं रुप घेऊन तू माझ्या भावनांशी खेळली आहेस. आताच्या आता निघ इथून नाहीतर… ” पुढे भुवनेश्वरी म्हणते, “आम्ही जे काही केलं ते तुमच्यावरच्या आणि अधिपतीवरच्या प्रेमापोटी केलं आहे. आता तुम्हीच न्याय करा, आमची फसवणूक मोठी की आमचं प्रेम”

हेही वाचा : ठरलं तर मग : अखेर ‘तो’ क्षण आलाच! अर्जुन सायलीला करणार प्रपोज, अंगठी सुद्धा आणली…; जबरदस्त प्रोमो आला समोर

भुवनेश्वरीचं खरं रुप समोर आल्यावर अधिपती बावरून जातो. पुन्हा एकदा बायकोवर अविश्वास दाखवल्याने त्याला काय बोलावं हे सुद्धा सुचत नसतं. त्यामुळे आता हे सूर्यवंशी कुटुंबीय भुवनेश्वरीला माफ करणार की घराबाहेर काढणार हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

Story img Loader