Tula Shikvin Changalach Dhada Upcoming Episode : ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण आहे चारुलता. अधिपतीची जन्मदात्री चारुलता परत आल्याने ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेला नवं वळण आलं आहे. चारुलताच्या परत येण्याने सत्य जाणून घेण्याची जेवढी अक्षराला उत्सुकता आहे तेवढीच प्रेक्षकांमध्येही पाहायला मिळत आहे. अशातच ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा नव्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडियावर ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changalach Dhada ) मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एका बाजूला आनंदाची घटना घडताना दिसत असून दुसऱ्या बाजूला एक धक्कादायक घटना घडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा हा प्रोमो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

thane building
डोंबिवलीत कोपरमध्ये रस्ता बंद करून बेकायदा इमारतीची उभारणी करणाऱ्या बांधकामधारकांना साहाय्यक आयुक्तांची नोटीस
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
Vishwas Ugle captured motherly moment on camera with little Tara lovingly cuddling her calf
ताडोबातील “छोटी तारा” च्या मातृत्वाचा क्षण…
Recently trader selling scrap was robbed at gunpoint in Baramatis Lokhande Vasti area
बारामतीत पिस्तुलाच्या धाकाने व्यापाऱ्याची लूट, ग्रामीण पोलिसांकडून तिघे गजाआड
2nd October Gandhi Jayanti Physical Mental Violence Religion
बदलतं जग आणि महात्मा
womens drum, womens in drum corps,
ढोलपथकातल्या ‘तिची’ दुखरी बाजू…
Murder of husband who is obstructing in immoral relationship
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून; पत्नीसह प्रियकर गजाआड, आरोपींकडून आत्महत्येचा बनाव
Woman In Bengaluru Killed Body Chopped
Bengaluru Murder : महालक्ष्मी हत्या प्रकरणातील संशयित आरोपीची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये गुन्ह्याची कबुली

हेही वाचा – Video: खुशबू तावडेचं दुसरं डोहाळे जेवण घरीच साध्या पद्धतीने पडलं पार, पाहा व्हिडीओ

या प्रोमोमध्ये, एका बाजूला अक्षरा चारुलताला घेऊन घरी आलेली पाहायला मिळत आहे. पण दुसऱ्या बाजूला चारुहास देवाकडे प्रार्थना करत मनातल्या मनात म्हणतो की, मला तुझ्याशी शेवटचं बोलायचं आहे. चारुची उणीव प्रत्येक क्षणी भासतेय. ज्या एका स्त्रीवर मी मनापासून प्रेम केलं. तिला इतक्या लवकर माझ्यापासून दूर नेलंस. ती गेल्यापासून प्रत्येक दिवसाचं ओझ वाटतंय माझ्यावर. आता असं वाटतंय की, मला जगण्याचा अधिकारच नाहीये. त्यानंतर चारुहास स्वतःच्या रुममध्ये जातो आणि तितक्यात चारुलता सूर्यवंशीच्या घरात गृहप्रवेश करते. यावेळी अक्षराने उंबरठ्यावर धान्यांनी भरलेलं माप ठेवलेलं असतं. त्यामुळे चारुलता ते माप ओलांडून सूर्यवंशीच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे.

तसंच दुसऱ्या बाजूला चारुहास गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changalach Dhada ) मालिकेत चारुलताच्या येण्याने सूर्यवंशी घरातील वातावरण कसं बदलतंय? आणि चारुहासला आत्महत्या करण्यापासून कोण रोखतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा- Video: ‘पारू’ फेम शरयू सोनावणेने हलगीवर धरला ठेका, डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस, म्हणाले, “शब्दच नाही..”

चारुलता हीच भुवनेश्वरी!

दरम्यान, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changalach Dhada ) मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहे. अनेकजण चारुलता हीच भुवनेश्वरी असल्याचं म्हणत आहे. चारुलताच्या वेशात येऊन भुवनेश्वरी नाटक करत असल्याचंही नेटकरी म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे आता चारुलता परत येण्यामागचं नेमकं काय सत्य आहे? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे.