Tula Shikvin Changlach Dhada Next Episode : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत सध्या अधिपतीची खरी आई चारुलता पुन्हा सूर्यवंशींच्या घरात परतल्याचा सीक्वेन्स चालू आहे. अधिपती व अक्षरा हनिमूनसाठी थायलंडला गेले असताना चारुहास रागात भुवनेश्वरीला घराबाहेर काढतो. फुकेतवरून घरी परतल्यावर अधिपती भुवनेश्वरीला घरभर शोधतो. आपली आई कुठेच सापडत नाहीये हे पाहून अधिपती बैचेन होतो. त्याचं कशातच लक्ष लागत नाही. इतक्यात एके दिवशी बाजारात अक्षराला भुवनेश्वरीसारखी बाई दिसते. अक्षरा या बाईला हाक मारत पुढे जाते मात्र, प्रत्यक्ष भेट झाल्यावर ती भुवनेश्वरी नसून स्वत:ची ओळख अक्षराला चारुलता अशी करून देते.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changlach Dhada ) या मालिकेत आता चारुलताची एन्ट्री झाल्याने एक नवा ट्विस्ट आला आहे. चारुलता ही अधिपतीची खरी आई असते. अनेक वर्षांनी अक्षरा सूर्यवंशी कुटुंबाच्या खऱ्या लक्ष्मीला घरी घेऊन येते. एकीकडे अक्षरा चारुलताला घरी घेऊन येते तर, दुसरीकडे चारुहास आत्महत्या करणार असतो. मात्र, चारुलताच्या घरी येण्याने संपूर्ण वातावरण बदलून जातं. चारुहासच्या मनात जगण्याची एक नवीन उमेद निर्माण होते. चारुलता आपल्या सुनेचं म्हणजेच अक्षराचं कौतुक करते. या सगळ्यात अधिपती चारुलताला कसा समोरा जाणार याचं दडपण अक्षराला असतं.

हेही वाचा : “ओव्हर अ‍ॅक्टिंग करून दमले…”, जान्हवीने पुन्हा ओलांडली पातळी! करिअरवर बोट ठेवत पॅडीचा अभिनयावरून केला अपमान

अधिपती-चारुलता येणार समोरासमोर

आता येत्या भागात चारुलता अन् अधिपती अनेक वर्षांनी एकमेकांसमोर येणार आहेत. भुवनेश्वरी आणि चारुलता दिसायला सारख्याच असतात पण, दोघींचे स्वभाव एकदम विरोधी असतात. अशा परिस्थितीत अधिपती आपल्या खऱ्या आईला म्हणजेच चारुलताला स्वीकारेल का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. चारुलताकडे पाहून अधिपती हसतो पण, त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहीसे बदलतात.

Tula Shikvin Changlach Dhada ( फोटो सौजन्य : झी मराठी )

हेही वाचा : “माणूस म्हणून नक्की कुठे जातोय आपण?” बदलापूर अत्याचार प्रकरणावर भडकली मृण्मयी; अक्षय केळकर म्हणाला, “कुठल्या तोंडाने…”

आता चारुलताच्या येण्याने मालिकेत नवीन काय ट्विस्ट येणार? काही नेटकऱ्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार चारुलता हीच भुवनेश्वरी नाही ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या चाहत्यांना लवकरच मिळणार आहेत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ( Tula Shikvin Changlach Dhada ) मालिकेत येत्या काळात काय वळण येणार हे पाहण्यासाठी सगळेजण उत्सुक आहेत.