Tula Shikvin Changlach Dhada : गणेशोत्सव सुरू असल्यामुळे सध्या सर्वत्र उत्साहाच वातावरण पसरलं आहे. सर्वजण भक्तीमय वातावरणात न्हाऊन गेले आहेत. मालिकांमध्येही बाप्पा विराजमान झाले आहेत. ‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘तुला शिकविन चांगलाच धडा’मध्ये गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया’ या जयघोषात सूर्यवंशी कुटुंबात लाडक्या बाप्पाचं विराजमान झालं आहे. पण अशातच बाप्पाच्या नैवेद्यावरून चारुलता व अधिपतीमध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे. नेमकं काय घडलं आहे? जाणून घ्या…

भुवनेश्वरीने पाडलेल्या परंपरेनुसार गणपतीच्या नैवेद्यासाठी आजी तळणीचे मोदक करते. पण त्यावेळेस चारुलता मधे येते आणि भुवनेश्वरीने पाडलेल्या परंपरेत बदल करण्याचा प्रयत्न करते. चारुलता आजीला म्हणते, “त्यांनी परंपरा पाळल्याचं असतील. कारण त्या परंपरा बदलण्याचा अधिकार त्यांच्याकडे नव्हता. तो फक्त या घरच्या सुनेलाच असतो आणि या घरची सून मी आहे. त्यामुळे मी ही परंपरा बदलू शकते आणि मी ही परंपरा बदलणार आहे.” म्हणून चारुलता स्वतःच्या हाताने उकडीचे मोदक नैवेद्यासाठी तयार करते. पण यावरून नंतर चारुलता आणि अधिपतीमध्ये वाद होतो. ( Tula Shikvin Changlach Dhada )

Tula Shikvin Changlach Dhada
Video : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत घटस्थापनेच्या दिवशी दुर्गेश्वरीनं रचलं कारस्थान; प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, “हाकलून द्या…”
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Tula Shikvin Changalach Dhada Akshara made a promise while Charulata was leaving home
तुला शिकवीन चांगलाच धडा : चारुलता घर सोडून जात असताना अक्षराने दिलं ‘हे’ वचन, तर अधिपतीने केला ‘हा’ निश्चय, पाहा नवा प्रोमो
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
sara kahi tichyasathi marathi serial off air soon
वर्षभरानंतर ‘झी मराठी’ची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! अभिनेत्याने पोस्ट शेअर करत दिला दुजोरा
govinda fan styed at his home as maid
“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”
tula shikvin changlach dhada

अधिपती रागवून चारुलताला म्हणाला…

सूर्यवंशीच्या घरी गणपतीचं आगमन होतं. सर्वजण बाप्पाची आरती करण्यासाठी लगबग करत असतात. तितक्यात अधिपती म्हणतो, “थांबा. आजीने तळणीचे मोदक केले आहेत ना?” चारुलता म्हणते, “मी उकडीचे मोदक केले आहेत. या उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवू या.” पण अधिपती म्हणतो, “आरती होईल, देवाला नैवेद्य दाखवला जाईल, पण तळणीच्या मोदकाचाच.” त्यावर चारुलता म्हणते की, परंपरा कधी ना कधीतरी बदलायच्या असतात. तू थोडा शांत राहा. यावेळी अधिपती रागवून म्हणतो की, या घरची परंपरा आमच्या आईसाहेबांनी घालून दिली आहे. तिच पुढं चालत राहणार. ( Tula Shikvin Changlach Dhada )

दरम्यान, चारुलता पुन्हा आल्यापासून प्रेक्षक तिच भुवनेश्वरी असल्याचं म्हणत आहेत. भुवनेश्वरी चारुलताच्या रुपात नाटक करत असल्याचं म्हटलं जात आहे. पण नेमकं काय खरं आणि काय खोटं हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल. ( Tula Shikvin Changlach Dhada )