‘लाखात एक आमचा दादा'(Lakhat Ek Aamcha Dada) या मालिकेत सध्या तेजूच्या लग्नाची घाई-गडबड पाहायला मिळत आहे. सूर्यापेक्षा लहान असलेली तेजू ही त्याची सर्वात लाडकी बहीण आहे. समजूतदार, प्रेमळ असलेल्या तेजूचे लग्न ठरण्यास अडचणी निर्माण होत होत्या. अखेर आता तुळजाच्या वडिलांनी डॅडींनी समीर निकमचे तिच्यासाठी स्थळ आणले आहे. ते तेजूसह तिच्या घरातील सर्वांना आवडले असल्याने हे तेजूचे समीर निकमबरोबर लग्न ठरवले आहे. आता तिचे लग्नाची तारीख जवळ आली असून त्याआधीच्या कार्यक्रमांना सुरूवात झाल्याचे एका प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

तेजूच्या हळदीत तुळजा सूर्यावर रूसणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये तेजूच्या हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. कार्यक्रमानिमित्त घराची सजावट केल्याचे पाहायला मिळत आहे. सूर्या, त्याचे मित्र, घरातील इतर मंडळी व तुळजाचा भाऊ शत्रू, डॅडी व तुळजाची आईदेखील हजर असल्याचे या प्रोमोमध्ये दिसत आहे. तेजूच्या लहान बहिणी तिला हळद लावताना भावुक झाल्याचे दिसत आहे. सूर्यासुद्धा त्याच्या लाडक्या बहिणीला हळद लावताना भावुक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण
इन्स्टाग्राम

या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, कार्यक्रमाच्या निमित्ताने एका व्यक्तीला गाणी गाण्यासाठी बोलावले आहे. पण त्याचे गाणे ऐकून काजू, पुड्या आणि इतरांनी कान बंद केल्याचे दिसत आहे.तर त्याचे मामा रडताना दिसत आहे. तुळजा सूर्याला विचारते, “काय गाणी वाजवायला सांगितलीस तू यांना?” सूर्या म्हणतो, “९० च्या दशकातील हिट गाणी आहेत. मामा बघ रमला आहे”, त्याच्या या बोलण्यावर तुळजा चिडली असून ती त्याला म्हणते, “सूर्या जराही रोमँटिक नाहीस तू. आपल्या बायकोला खूश कसं करायचं ते तुला कळतच नाही. मला ना तुझ्याशी बोलायचचं नाही आता.” असं म्हणून तुळजा तिथून रागावून निघून जाते. तुळजा तिथून गेल्यावर सूर्या म्हणतो, “मी रोमँटिक नाही? तुळजा आता बघ माझा रोमँटिकपणा.”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, डॅडींनी समीर निकम उर्फ पिंट्याला तुरुंगातून पॅरोलवर सोडवले आहे. त्यांचा मुलगा शत्रूबरोबर त्याचे लग्न लावून देण्यासाठी त्यांनी हे सर्व नाटक केले आहे. ऐन लग्नात पिंट्या गायब होईल आणि त्याजागी शत्रू तेजूबरोबर लग्न करेल, असा त्यांचा प्लॅन आहे.

हेही वाचा: Video : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला बॉलीवूडकरांची मांदियाळी! भर गर्दीत शाहरुख-सलमानच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

आता डॅडींचा प्लॅन यशस्वी होणार का, तुळजाचा रूसवा सूर्या कसा काढणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader