‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada) ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरताना दिसत आहे. सूर्या आणि तुळजा यांच्या कहाणीमध्ये आता नवीन ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे.

अखेर तो क्षण आला, तुळजाला झाली प्रेमात पडल्याची जाणीव

झी मराठी वाहिनीने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवर ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला एक महिला तुळजाला म्हणते, “अगं सणावाराला तुझ्या गळ्यात एकच मणी?”, त्यावर तेजश्री म्हणते, “तिचं मंगळसूत्र वाढलंय सकाळी.” त्यानंतर तुळजाची आई म्हणते, मंगळसूत्र वाढणं अशुभ असतंय. लवकरात लवकर दुरुस्त करून घे. त्यानंतर सूर्या त्याच्या सासरी म्हणजेच तुळजाच्या घरी गाडीवरून येताना दिसतो. त्याला पाहताच तुळजाचा भाऊ शत्रू म्हणतो, हा आलाय पठ्ठ्या घेऊ याला टप्प्यात, असे म्हणून तो हातातली जळकी काडी फटाके ठेवलेल्या ठिकाणी फेकतो. सगळे फटाके फुटू लागतात, तुळजा तिथेच असते. ती घाबरते आणि ओरडत म्हणते, “वाचवा, कुणीतरी वाचवा.” तिथे सूर्या येतो आणि तिच्या डोक्यावर कपडा टाकतो. त्यानंतर तुळजा मनातल्या मनात म्हणते, “सूर्या मी तुझ्या प्रेमात पडली आहे, आय लव्ह यू सूर्या.” पुढे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, सूर्या तुळजाला मंगळसूत्र देत म्हणतो, “मंगळसूत्र, अगं हेच द्यायला आलो होतो मी.” तुळजा त्याला म्हणते, “हे मंगळसूत्र तू माझ्या गळ्यात घालशील?” तिच्या या बोलण्यानंतर सूर्या तुळजाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे.”

what prithvik pratap wife prajakta vaikul do
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Paaru
“हा बिझनेस तुमचासुद्धा…”, प्रीतम व प्रियाचा तो संवाद ऐकताच पारूने घेतला निर्णय; म्हणाली, “या घरची मोठी सून म्हणून…”
tula shikvin changalach dhada charulata is the real bhuvneshwari
चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो
Tula Shikvin Changlach Dhada
Video: चारुलता की भुवनेश्वरी? अक्षरा पडली संभ्रमात; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
tula shikvin changalach dhada zee marathi serial bhuvaneshwari re enters in the show
प्रतीक्षा संपली! भुवनेश्वरी पुन्हा येणार…; अक्षराला दिसणार सासूबाईंची झलक, ‘या’ दिवशी असणार विशेष भाग, पाहा प्रोमो
झी मराठी इन्स्टाग्राम

हा व्हिडीओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “तुळजालाही लागतेय प्रेमाची चाहूल…!”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे तुळजाचे सूर्याबरोबरचे लग्न हे तिच्या मर्जीविरुद्ध झाले होते. आता मात्र तुळजा सूर्याच्या प्रेमात पडताना दिसत आहे.

हेही वाचा: Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निक्की तांबोळी-अरबाज पटेलने दिवाळीनिमित्ताने शेअर केला खास व्हिडीओ, राखी सावंतच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

दरम्यान, ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेतील सगळीच पात्रे त्यांच्या वेगळेपणामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत असतात. मालिकेत पुढे काय होणार, तुळजा तिच्या मनातल्या भावना सूर्याला सांगणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader