अभिनेता शिझान खान सध्या तुनिषा शर्माच्या आत्महत्येमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर शिझानला अटक करण्यात आली आणि सध्या तो पोलीस कोठडीत आहे. त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तुनिषाच्या मृत्यूबद्दल त्याची चौकशी केली जात आहे. तुनिषाने अली बाबा: दास्तान-ए-काबुल शोच्या सेटवर आत्महत्या केली होती. शिझानने ब्रेक अप केल्यामुळे नैराश्यातून तुनिषाने आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय.

अशातच शिझान मोहम्मद खानबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. शिझान लहान असताना त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाला होता. तसेच तो अगदी सात वर्षांचा असताना त्याला नैराश्याने ग्रासलं होतं. व्हर्च्युअल टेड टॉकदरम्यान त्याने याबद्दल खुलासा केला होता. त्याने त्याच्या पालकांच्या नातेसंबंधाबद्दल आणि पालकांची सतत भांडणं पाहून तो कसा मोठा झाला याबद्दल देखील सांगितलं होतं. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

“त्या मालिकेच्या सेटवर मला…” सिने असोसिएशनच्या अध्यक्षांनी वर्तवला संशय; तुनिषाच्या आत्महत्येच्या SIT चौकशीची मागणी

या सत्रात बोलताना शिझान म्हणाला होता, “घर ही एकमेव जागा आहे जिथे मुलाला सुरक्षित वाटतं, पण, माझ्या बाबतीत असं घडलं नाही. मी सात वर्षांचा असताना माझ्या आई-वडील आणि बहिणीबरोबर राहत होतो. पण माझं कुटुंब स्थिर नव्हतं, माझं त्यांच्याशी असलेल्या नात्यात प्रेम, जवळीक काहीच नव्हतं. माझे आई-वडील नेहमीच भांडत असत, माझ्याकडे ‘सुखी परिवार’ कधीच नव्हता. ते खूश नव्हते आणि अशा टप्प्यावर पोहोचले होते की ते एकमेकांना सहनही करू शकत नव्हते.”

“शिझानने माझ्या मुलीला लग्नाचं आमिष दाखवलं अन्…”; तुनिषाच्या निधनानंतर आईचा आक्रोश

यावेळी बोलताना शिझानने आयुष्यातील एका कठीण प्रसंगाचा खुलासा केला होता. तो म्हणाला, “एक दिवस आमच्या घरमालकाने संधी साधली. त्याने मला रडताना पाहिलं आणि घरात काय चाललंय ते त्याला कळलं. माझे वडील माझ्या आईला मारायचे आणि तेव्हा तो तिला वाचवायला यायचा. एके दिवशी त्याने संधी साधली… तो मला बागेत घेऊन गेला, मला हवं असलेलं आईस्क्रीम घेऊन दिलं. नंतर तो मला सार्वजनिक शौचालयात घेऊन गेला आणि त्याने अत्यंत वाईट पद्धतीने माझ्यावर अत्याचार केला. मी तुम्हाला सांगूही शकत नाही, इतका वाईट तो अनुभव होता. त्यानंतर मी तिथून पळत सुटलो, मी माझ्या घरी पळत गेलो. पण मी तिथेच राहायचो, त्यामुळे मला पुन्हा या गोष्टींचा सामना करावा लागेल, हे मला कळलं होतं. मी घरी गेलो आणि बाथरुममध्ये शिरलो, त्यानंतर कितीतरी वेळ मी स्वतःवर पाणी ओतत राहिलो. मला माझ्या आयुष्यात स्वतःचा इतका तिरस्कार कधीच वाटला नव्हता. त्यावेळी मला खूप भीती वाटत होती, मी एकटा होतो,” असा धक्कादायक अनुभव शिझानने सांगितला होता.

“व्हॅनिटी व्हॅनमध्ये…” तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीने उपस्थित केला प्रश्न

शिझानच्या वडिलांनी त्याला सोडून दिलं होतं, त्याच्या आयुष्यावर त्याचाही मोठा परिणाम झाला. “बाबा मला सोडून गेले होते. माझ्यावर प्रेम करणारा तो एकमेव माणूस होता. तेव्हापासून, माझ्यासाठी आयुष्य आणखी कठीण होत गेलं”, असं शिझानने सांगितलं होतं.