scorecardresearch

तुनिषा शर्माने १० दिवसांनी साजरा करणार होती वाढदिवस, ‘अशी’ केलेली जय्यत तयारी; सहकलाकाराने केला खुलासा

तुनिषा शर्माने १० दिवसांनी साजरा करणार होती वाढदिवस, ‘अशी’ केलेली जय्यत तयारी

तुनिषा शर्माने १० दिवसांनी साजरा करणार होती वाढदिवस, ‘अशी’ केलेली जय्यत तयारी; सहकलाकाराने केला खुलासा
येत्या दहा दिवसात तुनिषा शर्मा २१ वर्षांची होणार होती.

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्यामुळे सिनेसृष्टीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावर कमी कालावधीत यश संपादन करणाऱ्या या तरुण अभिनेत्रीच्या आयुष्यात असं काय झालं की तिला आयुष्य संपवावं लागलं? यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा कथित प्रियकर शिझान खान याला काल अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणानंतर अनेक कलाकार तिच्याविषयी विविध खुलासे करताना दिसत आहे.

तुनिषा शर्माचा वाढदिवस ४ जानेवारी रोजी होता. येत्या दहा दिवसात ती २१ वर्षांची होणार होती. पण त्यापूर्वीच तिने गळफास घेत आत्महत्या केली. तिने तिच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली होती. तिने अनेक कलाकारांना आमंत्रणही दिले होते. पण तिने अचानक आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे, असे टीव्ही अभिनेता विनीत रैनाने सांगितले.

आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर

विनीतने त्याच्या इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. यातील पहिला फोटो हा त्यांच्या चॅटिंगचा आहे. यात तुनिषाही विनीतला भेटण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसत आहे. यात तुनिषा म्हणालेली, आपण लवकरच भेटूया. माझा वाढदिवस येतोय येत्या ४ डिसेंबरला. तेव्हा आपण पार्टी करु. हा मेसेज १५ डिसेंबरला संध्याकाळी ७ च्या सुमारास करण्यात आले होते.

तर विनीतने शेअर केलेली दुसरी पोस्ट तिच्या मृत्यूनंतर केलेली आहे. यात त्याने तिचा एक फोटो शेअर केला आहे. “तुझा हा फोटो मी क्लिक केला होता. त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की हा फोटो शेवटचा असेल. तू मला म्हणाली होतीस की मी जेव्हा मुंबईत येईन, तेव्हा तू मला भेटशील आणि तेव्हा आपण तुझा वाढदिवस थाटात साजरा करु. त्यावेळी तू माझ्यासाठी गाणंही म्हणशील. पण तू हे योग्य नाही केलंस. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो. तू माझ्या हृदयात कायम राहशील”, असे त्याने म्हटले आहे.

आणखी वाचा : तुनिषाने गळफास घेण्यासाठी केलेला ‘या’ गोष्टीचा वापर, शवविच्छेदनाच्या अहवालात विविध खुलासे

तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्‍यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणानंतर रात्री उशिरा तिचा मृतदेह जे. जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात रात्री दीड वाजता तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु झाले. पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.  

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 20:49 IST

संबंधित बातम्या