तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला. मालिकेच्या सेटवरच तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणात तुनिषाचा एक्सबॉयफ्रेंड म्हणजेच शिझान खानला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात असून शिझानला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या प्रकरणात आता शिझानला न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला आहे.

शिझानला न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी दोन याचिका दाखल केल्या, ज्यात त्यांचं म्हणणं आहे शिझान मानसिक तणावात आहे. अशा परिस्थितीत तो कोणतेही चुकीचे पाऊल उचलू शकतो, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवावी लागेल. याशिवाय केस न कापण्यासाठी आणखी एक अर्ज केला होता. आत त्यावर न्यायालयाने हा अर्ज मान्य केला आहे. पुढील महिनाभर कारागृहात शिझानचे केस कापू नयेत, असे आदेश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.

CJI Chandrachud says enactment of three new criminal laws
नवीन फौजदारी कायदे समाजासाठी ऐतिहासिक! न्याय व्यवस्थेचे नवीन युगात संक्रमण झाल्याची सरन्यायाधीशांकडून प्रशंसा
Death nurse, Corona, compensation husband,
करोनाकाळात परिचारिकेचा मृत्यू, पतीला नुकसानभरपाई नाकारण्याची राज्य सरकारची भूमिका संवेदनशील, उच्च न्यायालयाचे ताशेरे
mumbai high court, Senior Citizens, Maintenance Act, Misuse in Property Disputes, Tribunal s Role Emphasized, property disputes, property disputes in senior citizens,
मालमत्ता वादात कायद्याचा गैरवापर, उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Important decision of the supreme court
उमेदवारांनी संपत्ती म्हणून घड्याळही जाहीर करावं का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल; मालमत्ता प्रकरणी दिला महत्त्वपूर्ण निकाल

५९ मृत्यू, १०० हुन अधिक जखमी; दिल्लीतील ‘या’ सत्यघटनेवर आधारित वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

शिझानच्या वकिलाने सांगितले की, सरकारी वकिलांनी त्याचे केस कापू नयेत या मागणीला कडाडून विरोध केला. मात्र, न्यायालयाने शिझानला केस कापण्यास महिनाभर बंदी घातली. या प्रकरणी शिझानच्या जामिनावर आता ७ जानेवारीला सुनावणी होणार आहे.

“तुनिषाची आत्महत्या, भीतीचं वातावरण अन्…”, पाच दिवसांनी मालिकेच्या शूटिंगसाठी सेटवर परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला अनुभव

दरम्यान या शिझान, तुनिषा शर्माच्या कटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत. नुकतंच शिझानच्या कुटुंबियांनी एक दावा केला आहे की तुनिषाचा मामा म्हणून माध्यमांसमोर येणारा पवन शर्मा हा तिचा मामा नसल्याचा दावा शिझानच्या कुटुंबाने केला आहे. तो तिचा मामा नव्हे तर तिचा मॅनेजर होता, असं त्यांनी सांगितलं.