टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. २४ डिसेंबरला तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी तुनिषाचा बॉयफ्रेंड व सहकलाकार शीझान खान पोलिसांच्या ताब्यात आहे. तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी सेलिब्रिटींसह राजकीय वर्तुळातील व्यक्तीही व्यक्त होताना दिसत आहेत. या प्रकरणावर प्रसिद्ध अभिनेत्याने भाष्य केलं आहे.

अभिनेता केआरकेने तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणावर ट्वीट केलं आहे. “एका चुकीच्या निर्णयामुळे दोन आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. तुनिषा शर्माचं जीवन संपलं. पण याबरोबरच शीझान खानचं करिअरही संपुष्टात आलं आहे. तुनिषा इतकी भावनिक होती, तर शीझान खानने समजूदारपणे ही परिस्थिती हाताळायला हवी होती”, असं केआरकेने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केआरकेने केलेलं हे ट्वीट चर्चेत आहे.

nilesh sable recalls meeting raj thackeray
निलेश साबळेने सांगितला राज ठाकरेंच्या घरी घडलेला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर…”
mrunal dusanis daughter name is nurvi
मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? नाव ठेवलंय खूपच खास, पहिल्यांदाच सांगितला अर्थ
marathi actor Suyash Tilak new serial aadishakti coming soon
Video: ‘अबोली’मधील दमदार भूमिकेनंतर सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत, सोबतीला असणार ‘देवयानी’मधील ‘हा’ अभिनेता
Kashmera Shah on govinda attending Krushna Abhishek sister Arti Singh marriage
भाची आरती सिंहच्या लग्नात गोविंदा सहभागी होणार का? कश्मीरा शाह म्हणाली, “…मी त्यांच्या पाया पडेन”

हेही वाचा>> “आई-वडिलांचा विचार येत नाही का?”, तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध दिग्दर्शकाची संतप्त पोस्ट

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे हिंदी जाहिरातीत झळकला; पोस्ट शेअर करत म्हणाला…

बॉयफ्रेंड शीझान खानने ब्रेकअप केल्यामुळे तुनिषा शर्मा डिप्रेशनमध्ये होती. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. सध्या शीझान खानला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही पाहा>> Photos: तुनिषा शर्माने शूटिंगदरम्यानच केली आत्महत्या; मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं?

२० वर्षीय तुनिषा शर्मा ‘अलीबाबा: दास्तान ए कबूल’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. मालिकेच्या सेटवरच तिने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या मृतदेहावर २७ डिसेंबरला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.