scorecardresearch

Video: पोलिसांनी अनवाणी शिझान खानला खेचलं अन्… कोर्टात नेतानाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी

Video: “ही क्रूरता आहे” पोलिसांनी शिझानला खेचत कोर्टात नेल्याने नेटकऱ्यांचा संताप

Video: पोलिसांनी अनवाणी शिझान खानला खेचलं अन्… कोर्टात नेतानाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येप्रकरणी तिचा बॉयफ्रेंड आणि सहकालाकार अभिनेता शिझान खान पोलीस कोठडीत आहे. अभिनेत्रीने २४ डिसेंबरला आत्महत्या केली होती, त्याच दिवशी तिच्या आईच्या तक्रारीनंतर शिझानला पोलिसांनी अटक केली आणि त्याला चार दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. शिझानची कोठडी २८ डिसेंबरला संपली. त्यानंतर त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळचा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण: शिझानच्या मेकअप रुममध्ये सापडली चिठ्ठी, त्यावर लिहिलंय…

२८ डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयात नेण्यात आलं आणि तो चर्चेत आला. त्याचं कारण त्याचा जबाब नव्हता, तर त्याला दिली गेलेली वागणूक होती. शिझानला पोलीस कोर्टात नेत असताना त्याचा चेहरा हुडीने झाकला होता. पण पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला न्यायालयात खेचत नेलं, शिवाय त्याच्या पायात चप्पलही नव्हती. पापाराझी आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा झाल्यामुळे पोलिसांनी त्याला घाईत ओढत आणि ढकलत कोर्टात नेलं. यावेळचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यानंतर नेटकऱ्यांना शिझानला अशा रितीने वागणून दिल्याचं पटलेलं नाही. त्यांनी हा व्हिडीओ पाहत नाराजी व्यक्त केली आहे.

पालकांची भांडणं, सातव्या वर्षी घरमालकाकडून लैंगिक अत्याचार अन्… तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खानने आयुष्याबद्दल केलेले धक्कादायक खुलासे

“त्याला पायात शूजही घालू दिलेले नाही? पोलीस अशी वागणूक कसे काय देऊ शकतात”, असं एकाने म्हटलंय. तर, “पुराव्याशिवाय त्याच्याशी इतकं वाईट वागणं खूप चुकीचं आहे. हा न्याय नाही, ही क्रूरता आहे”. ही “घृणास्पद आणि लज्जास्पद वागणूक आहे” असं काही जणांनी म्हटलंय. तसेच “जर ती (तुनिषा) भावनिकदृष्ट्या कमकुवत होती, तर ती शिझानची चूक नाही, ब्रेक अप सामान्य गोष्ट आहे, जर एखाद्याला त्यासाठी तुरुंगात टाकावं लागलं तर भारतातील निम्मी लोकसंख्या तुरुंगात असेल. आणि ज्या पद्धतीने त्याला नेण्यात आले ते खूप अमानवीय आहे,” अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे.

दरम्यान, शिझानला २८ डिसेंबरला कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्याची कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. शिझान ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत असेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-12-2022 at 16:56 IST

संबंधित बातम्या