scorecardresearch

Premium

“तुम्ही भारतीय रेल्वेत ४० वर्ष…”, ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अक्षया देवधरचे वडील झाले सेवानिवृत्त! अभिनेत्री म्हणते, “आता…”

‘तुझ्यात जीव रंगला’ फेम पाठकबाईंची वडिलांसाठी खास पोस्ट, म्हणाली…

akshaya deodhar shares happy retirement post for her father
अक्षया देवधरची वडिलांसाठी खास पोस्ट

अभिनेत्री अक्षया देवधर ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेमुळे अक्षयाला आता सर्वत्र पाठकबाई अशी वेगळी ओळख मिळाली आहे. या मालिकेत अक्षयाने अंजली पाठक ही भूमिका साकारली होती. अक्षयाने वैयक्तिक आयुष्यात या मालिकेतील तिचा सहकलाकार आणि लोकप्रिय अभिनेता हार्दिक जोशीबरोबर लग्न केलं आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक प्रसंग ती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करते. अक्षयाने तिच्या बाबांसाठी शेअर केलेल्या नुकत्याच एका इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

अक्षया देवधरचे बाबा भारतीय रेल्वेत गेली अनेक वर्ष काम करत होते ते ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्ती समारंभातील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत अक्षयाने वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली आहे. “Happy Retirement बाबा! तुम्ही भारतीय रेल्वेत जवळपास ४० वर्ष काम केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्हाला तुमचा कायम अभिमान आहे. आता वर्ल्ड टूर!” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोला दिलं आहे.

priya marathe supports ankita lokhande
“तिचा संघर्ष…”, मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेसाठी पोस्ट, ‘पवित्र रिश्ता’मध्ये केलंय एकत्र काम, कोण आहे ती?
Niharika Konidela reacts on her divorce
उदयपूरमध्ये शाही सोहळ्यात केलं लग्न, वर्षभरातच पतीपासून विभक्त झाली अभिनेत्री; म्हणाली, “मला किती त्रास झाला हे…”
Marathi Actress Sonalee Kulkarni malaikottai vaaliban malayalam movie Mohanlal Lijo Jose Pellissery marathi film industry
मराठमोळ्या अभिनेत्रीचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, अनुभव सांगत म्हणाली, “मराठी व मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर…”
Alyy Khan Kajol kissing scene
“माझा व काजोलचा किसिंग सीन मी पत्नी अन् मुलीबरोबर पाहिला”, अभिनेत्याचा खुलासा; त्यांची प्रतिक्रिया सांगत म्हणाला…

हेही वाचा : “काय कमाल आहे ना बायकांची?”, ‘झिम्मा २’च्या अभिनेत्रींसाठी सिद्धार्थ चांदेकरची खास पोस्ट; म्हणाला, “तुम्ही खरंच…”

अक्षया आणि तिच्या वडिलांमध्ये फारचं सुंदर नातं आहे. यापूर्वी लाडक्या लेकीच्या लग्नात तिचे बाबा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सेवानिवृत्त झाल्यावर अक्षयाच्या वडिलांना त्यांची नोकरी व भारतीय रेल्वेची आठवण कायम लक्षात राहावी म्हणून छोटं इंजिन खास भेटवस्तू देण्यात आलं आहे. याचा फोटो सुद्धा अक्षयाने शेअर केला आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : संतापलेल्या अर्जुनला सायली ‘असा’ देणार धीर, मालिकेत बहरणार दोघांचं नातं, पाहा प्रोमो

दरम्यान, अक्षया देवधरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेनंतर तिने ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात काम केलं. लवकरच तिची आणि राणादाची जोडी प्रेक्षकांना एकत्र चित्रपटात पाहायला मिळणार अशा चर्चा सुरू आहेत. याशिवाय हार्दिक जोशी लवकरच ‘जाऊ बाई गावात’ या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tuzyat jeev rangala fame akshaya deodhar shares happy retirement post for her father sva 00

First published on: 30-11-2023 at 14:39 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×