scorecardresearch

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, शिझान खानला ४ दिवसांची पोलीस कोठडी

तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर

अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, शिझान खानला ४ दिवसांची पोलीस कोठडी
तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केली आहे. सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत ती मुख्य भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीसह सर्वत्र खळबळ उडाली आहे. तुनिषाने मालिकेच्या सेटवरच गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वांनाचा धक्का बसला आहे. तुनिषाच्या आत्महत्येनंतर तिचा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक करण्यात आली होती. यानंतर त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर अनेक खुलासे होताना दिसत आहे. तिच्या मृत्यूनतंर अभिनेत्रीच्या आईने  ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेतील सह-कलाकार आणि कथित बॉयफ्रेंड शिझान खानवर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार शिझान खानला अटक करण्यात आली होती. शिझान खानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे.”
आणखी वाचा : तुनिषा शर्माच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला? कारण आले समोर

यानंतर पोलिसांनी शिझानच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर आज दुपारी त्याला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने झिशानला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता चार दिवस तो पोलीस कोठडीत असणार आहे.

शिझान खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण पोलिसांकडे अद्याप कोणतेही पुरावे नाहीत. त्याच्यावर फक्त आरोप केले जात आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

आणखी वाचा : बॉयफ्रेंडची मेकअप रुम, आत्महत्या अन् धावपळ; तुनिषाच्या आत्महत्येनंतर पोलीस शोधत आहेत ‘या’ पाच प्रश्नांची उत्तरं

तुनिषा शर्मा ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टिव्ही मालिकेत मुख्य भूमिका करत होती. या मालिकेचे शूटिंग वसई पुर्वेच्या कामण येथील भजनलाल स्टुडियोत सुरू होते. शनिवारी दुपारी मध्यंतरानंतर साडेतीन वाजता ती आपल्या मेकअप रूपमध्ये गेली आणि गळफास घेतला. ही बाब संध्याकाळी ५ वाजता सहकार्‍यांना समजली. तिला वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणानंतर रात्री उशिरा तिचा मृतदेह जे. जे रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणण्यात आला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात रात्री दीड वाजता तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सुरु झाले. पहाटे ४ वाजेपर्यंत तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. सध्या व्हिसेरा जतन करण्यात आला आहे. त्यामुळे अद्याप याचा अहवाल समोर आलेला नाही. हा अहवाल समोर आल्यानंतर काही गैरप्रकार घडला की नाही, याबद्दलची माहिती समोर येईल.  

तुनिषाच्या शवविच्छेदन अहवालाकडे पोलिसांसह इतर सर्वजणांचेही लक्ष लागले आहे. यात ती डिप्रेशनमध्ये होती की नाही, त्यामुळे तिने आत्महत्येसारखे पाऊल उचलले का? ती गरोदर होती का? याबद्दलची माहिती उघड होणार आहे. तुनिषाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनेक गुपिते उघड होऊ शकतात, असा दावा केला जात आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 14:04 IST

संबंधित बातम्या