scorecardresearch

दोन लग्न, दोन्ही वेळा घटस्फोट; ४५ वर्षीय सुप्रसिद्ध अभिनेत्री शोधतेय तिसरा जोडीदार, एकटीच करते मुलांचा सांभाळ, म्हणाली, “कधीतरी…”

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा, एकटीनेच करते दोन मुलांचा सांभाळ

Deepshikha Nagpal Deepshikha Nagpal husband
सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा वैवाहिक आयुष्याबाबत खुलासा, एकटीनेच करते दोन मुलांचा सांभाळ

कलाक्षेत्रामधील अनेक अभिनेत्रींना त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. काही अभिनेत्रींनी आपलं वैवाहिक आयुष्य इतरांपासून लपवून ठेवलं. तर काहींनी याबाबत उघडपणे भाष्य केलं. यामधीलच एक अभिनेत्री म्हणजे दीपशिखा नागपाल. छोट्या पडद्यावरील सुपरहिट मालिकांमध्ये दीपशिखाने उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलसं केलं. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीला वैवाहिक आयुष्यामध्ये बराच त्रास सहन करावा लागला.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ करत असतानाही प्रियदर्शनीकडे मुंबईमध्ये राहण्यासाठी नव्हतं हक्काचं घर, म्हणाली, “वनिता खरातने तेव्हा…”

दीपशिखा एकदा नव्हे तर दोन वेळा लग्नबंधनात अडकली. पण तिचा दोन्ही वेळा घटस्फोट झाला. आता ती तिच्या मुलांचा एकटीनेच सांभाळ करते. ‘न्यूज १८ हिंदी’च्या वृत्तानुसार दीपशिखाने दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत भाष्य केलं आहे. ती म्हणाली, “सगळं काही मी एकटीने करत आहे. आता मी या जबाबदाऱ्या सांभाळत असताना थकली आहे”.

आणखी वाचा – “फक्त बघून मोकळं व्हायचं” ‘तो’ व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्याची तक्रार, समीर चौघुलेंनी चक्क माफी मागितली अन्…

“पण कधीतरी आपल्यालाही जोडीदाराची गरज आहे असं वाटतं. मी जेव्हा आजारी होते तेव्हा सतत रडत होते. माझी सर्जरी झाली होती. सर्जरीपूर्वी आलेल्या नैराश्येमुळे असं होत आहे का? असंही मी डॉक्टरांना विचारलं. छोट्या छोट्या गोष्टींवरुन मी रडत होते. मी घरी गेल्यानंतर माझ्या मुलांसमोरही रडले. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्हाला आपल्या माणसांची गरज लागते”.

आणखी वाचा – …तरच करीना कपूर खानचा लेक रात्रीचं जेवण जेवतो, २ वर्षांच्या जेहबाबत अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली…

दीपशिखा आता एकटीच आयुष्य जगत आहे. १९९७मध्ये तिने जीत उपेंद्रबरोबर पहिलं लग्न केलं. त्यानंतर दीपशिखा व जीतचा २००७मध्ये घटस्फोट झाला. २०१२मध्ये तिने केशव अरोराबरोबर दुसरं लग्न केलं. पण २०१६मध्ये या दोघंही एकमेकांपासून विभक्त झाले. दुसऱ्या पतीवर दीपशिखाने घरगुती हिंसाचाराचे आरोपही केले होते. दीपशिखाला आता वेदिका आणि विवान अशी दोन मुलं आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 11:35 IST

संबंधित बातम्या