tv actress hina khan break up with bf tocky jaiswal after 13 years of relationship rumours | Loksatta

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानचं १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप? पोस्टमुळे चर्चेला उधाण

हिना खान व बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानचं १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप? पोस्टमुळे चर्चेला उधाण
हिना खान व बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालच्या नात्यात दुरावा.(फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

हिना खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. सध्या हिना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

हिना बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसह गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. २००९ साली ते पहिल्यांदा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर भेटले होते. परंतु, आता त्यांच्यात दुरावा आल्याचं दिसत आहे. हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली होती. “विश्वासघात हे एकमेव सत्य आहे जे टिकून राहतं” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं. हिनाच्या या पोस्टमुळे रॉकी व तिच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे तब्बल १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हिना व रॉकी ब्रेकअप करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा>> अनिल कपूर यांची जितेंद्र जोशीसाठी खास पोस्ट, ट्वीट करत म्हणाले…

हेही वाचा>>Video: वयाने लहान असलेल्या अभिनेत्याबरोबर शिल्पा तुळसकरचा रोमान्स; वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये दिसली इंटिमेट सीनची झलक

हिनाने काही वेळानंतर तिची इन्स्टाग्राम स्टोरी डिलिट केली. परंतु, तिच्या स्टोरीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हिना अनेकदा बॉयफ्रेंड रॉकीबरोबरचे फोटो शेअर करताना दिसायची. गेल्या वर्षीही हिना खानने “ही वेळ ब्रेकअप करण्याची आहे” अशा आशयाची पोस्ट केली होती. तेव्हाही तिच्या ब्रेकअपबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या.

हेही पाहा>> Photos: अर्जुन कपूरच्या बाळाची आई होण्याबाबत मलायका अरोरा स्पष्टच बोलली, म्हणाली “आम्ही याचा विचार…”

हिनाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतील अक्षरा या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली होती. ‘कसोटी जिंदगी की’ या मालिकेतील तिची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. हिना ‘बिग बॉस हिंदी’च्या ११व्या पर्वातही सहभागी झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 12:14 IST
Next Story
मेहंदी सजली गं…! मालिका संपताच समृद्धी केळकरच्या घरी लगीनघाई