scorecardresearch

“अन्याय व द्वेष…”, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग

Bharat Joda Yatra: टीव्ही अभिनेत्री ‘भारत जोडो यात्रे’त सहभागी, राहुल गांधीबरोबरचे फोटो व्हायरल

“अन्याय व द्वेष…”, राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’त प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग
राहुल गांधींच्या यात्रेत टीव्ही अभिनेत्री सहभागी. (फोटो: इन्स्टाग्राम)

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे गेल्या दोन महिन्यांपासून भारत जोडो यात्रेदरम्यान देशात फिरत आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दिसून येत आहे. टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी हिनेही बुधवारी (४ डिसेंबर)ला भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला.

भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात आल्यानंतर काम्या पंजाबी राहुल गांधींच्या या यात्रेत सहभागी झाली. काम्या व राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेदरम्यानचा व्हिडीओ कॉंग्रेसच्या ऑफिशिअल अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा>> दीपिका-रणवीर २०२३ मध्ये होणार आईबाबा? अभिनेत्री म्हणालेली “आम्हाला मूल हवं आहे, पण…”

“अन्याय व तिरस्काराच्या विरोधात उठणारी पावलं भारत जोडो यात्रेत सहभागी होत आहेत. यामुळे आमची शक्तीही वाढत आहे”, असं कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलं आहे. काम्यानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुनही हा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा>> उर्फी जावेदने चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं; भगवा ड्रेस परिधान करत ‘बेशरम रंग’ गाण्यावर व्हिडीओ बनवला अन्…

हेही वाचा>> “मी बाहेर आलोय पण…”, ‘बिग बॉस’च्या घरातून एक्झिट घेतल्यानंतर आरोह वेलणकरची पोस्ट

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत याआधीही अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. पूजा भट्ट, रिया सेन, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी, अमोल पालेकर या कलाकारांनी सहभाग घेतला होता. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करही भारत जोडो यात्रेत सहभागी झाली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-01-2023 at 13:26 IST

संबंधित बातम्या