प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री कृष्णा मुखर्जी नुकतीच विवाहबंधनात अडकली. १३ मार्चला कृष्णा मुखर्जीने चिराग बाटलीवालाबरोबर लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. बंगाली व पारसी पद्धतीने कृष्णा व चिराग यांचा विवाहसोहळा पार पडला. गोव्यात पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला अनेक सेलिब्रिटींना हजेरी लावली होती. लग्नानंतर कृष्णा पती चिरागसह हनिमूनला गेली आहे. कृष्णा चिरागबरोबर तिचा हनिमून एन्जॉय करताना दिसत आहे. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. हनिमुनला गेल्यानंतर कृष्णाने खाण्यासाठी मॅगीची ऑर्डर दिली होती. या मॅगीची किंमत तब्बल १८०० रुपये इतकी होती. मॅगी खातानाचा व्हिडीओ कृष्णाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला होता. या व्हिडीओत तिचा पती चिराग "१८०० रुपयाची मॅगी खात आहे" असं म्हणताना दिसत होता. हेही वाचा>> खासदार श्रीकांत शिंदेंचा झी युवा पुरस्काराने सन्मान, व्हिडीओ शेअर करत म्हणाले… हेही वाचा>> बॉलिवूडमधील ‘या’ सुप्रसिद्ध गायिकेने गायलं झी मराठीच्या नवीन मालिकेचं शीर्षकगीत, व्हिडीओ व्हायरल कृष्णाने पती चिरागबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती नव्या नवरीच्या हातातील चुडा फ्लॉन्ट करताना दिसत आहे. कृष्णाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'नागिण', 'ये है मोहब्बते' या मालिकांमुळे तिला प्रसिद्धी मिळाली. कृष्णाचा पती चिराग नौदल अधिकारी आहे. एक वर्ष डेट केल्यानंतर कृष्णा व चिरागमे लग्न करण्याचा निर्णय घेतला.