TV Actress Announce Second Pregnancy : टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक तिच्या सौंदर्य, स्पष्टवक्तेपणामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी ती तिच्या एका वेगळ्याच, कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार आहे.

रुबिना दिलैकने २८ जानेवारी २०२६ रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे तिने अगदी खास पद्धतीने तिच्या प्रेग्नन्सीची बातमी दिल्याचे दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रुबिना दिलैकने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती दीर्घ श्वास घेते आणि नंतर म्हणते, “मी प्रेग्नंट आहे…” हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहते गोंधळात पडले आहेत. रुबिना खरोखरच पुन्हा आई होणार आहे की, हा एखाद्या नवीन प्रोजेक्टचा भाग आहे, असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

या व्हिडीओनंतर रुबिना दिलैकने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने लिहिलेय, “जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही, तर ती देवाच्या योजनेनुसार त्याहूनही चांगल्या प्रकारे घडते. हीच खरी सुंदरता आहे.”

या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे की, रुबिना दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे. मात्र, याबाबत अजूनही अभिनेत्रीने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र तिच्या व्हिडीओमुळे ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे

लग्नानंतर ५ वर्षांनी जुळ्या मुलींना दिला जन्म

रुबिना दिलैकने प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अभिनव शुक्लाबरोबर २०१८ साली लग्न केले होते. लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांनी जुळ्या मुलींना जन्म झाला. ईधा आणि जीवा, अशी त्यांच्या मुलींची नावे आहेत.

रुबिना आणि अभिनवची पहिली भेट कुठे झाली?

रुबिना आणि अभिनव ‘बिग बॉस १४’ आणि ‘पति पत्नी और पंगा’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकत्र दिसले होते. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांची पहिली भेट एका मित्राच्या घरी गणपती पूजेच्या वेळी झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघांनी जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केले आणि २०१८ मध्ये कुटुंबाच्या संमतीने लग्न केले.

लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र ‘बिग बॉस १४’मध्ये दोघांनी एकत्र सहभाग घेतला आणि आपले गैरसमज दूर करीत त्यांच्या नात्याला पुन्हा एकदा संधी दिली.