Sanchita Ugale Last Instagram Post Video Viral Before Suicide: टीव्ही विश्वातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. २२ वर्षीय अभिनेत्री संचिता उगले हिने नालासोपाऱ्यात राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या दुर्दैवी घटनेनंतर संचिताने आत्महत्येच्या अवघ्या २१ तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केलेली शेवटची पोस्ट आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संचिता अत्यंत आनंदी चेहऱ्याने लिप्सिंग करताना दिसत आहे. इतकी आनंदी दिसणारी मुलगी अचानक असं टोकाचं पाऊल कसं उचलू शकते, असा सवाल करत चाहत्यांनी व्हिडीओवर कमेंट्स करत दुःख व्यक्त केले आहे.
संचिता उगले हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर २१ तासांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती आलिया भट्टच्या ‘राधा तेरी चुनरी’ या गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. या व्हिडीओत संचिता खूप खूश दिसतेय, हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही वेळाने तिने आत्महत्या केली.
संचिताने ‘मैं नाचू तू नचा’, असं कॅप्शन लिहून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडीओत संचिता हातात कॅमेरा पकडून आरशात लिप्सिंग करताना दिसतेय.
पाहा संचिता उगले हिची शेवटची पोस्ट
दरम्यान, संचिताच्या आत्महत्येची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हा शेवटचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर काही वेळेतच तिने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीये. व्हिडीओमध्ये संचिता इतकी आनंदी दिसतेय, ती आत्महत्या कशी काय करू शकते, संचिताने आत्महत्या केली यावर विश्वास ठेवणं कठीण जातंय, अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. तसेच काही चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करून तिला श्रद्धांजली वाहिली आहे.
संचिता उगले हिने घरात कोणीच नसताना केली आत्महत्या
संचिता उगले हिने रविवारी १४ जून रोजी संध्याकाळी ५:३० च्या सुमारास तिची धाकटी बहीण घराबाहेर गेल्यावर आत्महत्या केली. संचिता तिचे आई-वडील आणि १५ वर्षांच्या लहान बहिणीबरोबर राहत होती. घरात कोणीही नसताना संचिताने बेडरूममध्ये साडीला गळफास घेतला. कुटुंबीयांनी तिला पाहिल्यानंतर तातडीने रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी संचिताला तिला मृत घोषित केलं.
संचिताच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांना सांगितलं की त्यांना कोणावरही संशय नाही. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तसेच संचिताच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट देखील आढळलेली नाही.
