Surbhi Jyoti Pregnant With Twins : टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी ज्योती ही लवकरच आई होणार आहे. लग्नानंतर जवळपास दीड वर्षानंतर गरोदरपणाची गोड बातमी तिने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. सुरभीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करीत ही गुड न्यूज दिली. सुरभी सध्या आपल्या गरोदरपणाच्या प्रवासाचा आनंद घेत आहे. ती सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना अपडेट देत असते.
सुरभी ज्योती जुळ्या बाळांना देणार जन्म?
दरम्यान, एका नवीन बातमीने तिच्या चाहत्यांचा उत्साह आता द्विगुणित केला आहे. सुरभी एक नाही, तर चक्क जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. विशेष म्हणजे आपल्या गरोदरपणाच्या चौथ्या महिन्यात तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
सुरभीने फोटो शेअर केल्यानंतर ती जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याची चर्चा रंगली होती. तिच्या बेबी बंपवरून चाहत्यांनी ती जुळ्या मुलांना जन्म देणार असल्याचे तर्कवितर्क लावायला सुरुवात केली होती. त्यावर आता अभिनेत्रीनेच शिक्कामोर्तब केले आहे. एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, सुरभी जुळ्या मुलांची आई होणार आहे. त्याबद्दलचा एक क्यूट फोटो अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
गरोदरपणाच्या काळात सुरभी स्वतःची खूप काळजी घेत आहे. ती सध्या आपला जास्तीत जास्त वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवत असल्याचे दिसते. काही काळापासून सुरभी सोशल मीडियावर फारशी सक्रिय नव्हती. त्यामुळे चाहते तिच्या जुन्या पोस्टवर “ती कुठे आहे”, असे विचारत होते. आता तिने स्वतःच यामागचे कारण सांगितले आहे.
‘या’ महिन्यात सुरभी देणार बाळांना जन्म
सुरभीने ११ रोजी फेब्रुवारी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये एका बाजूला तिच्या पतीचे पाय, दुसऱ्या बाजूला सुरभीचे पाय आणि मधोमध छोट्या बाळाचे बूट ठेवलेले पाहायला मिळालं होतं. या फोटोसह तिने “आमच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर प्रवास आता सुरू होणार आहे. आमचं बाळ यंदा जूनमध्ये या जगात येणार आहे”, असे म्हणत तिने आई होणार असल्याचा आनंद व्यक्त केला होता.

सुरभीबद्दल सांगायचे झाल्यास, तिने ‘कुबूल है’, ‘नागिन’, ‘गुनाह’, ‘कोई लौट के आया है’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय ती काही वेबसीरिजमध्येही दिसली आहे. तिने ‘इक कुडी पंजाब दी’, ‘रौला पै गया’, ‘क्या मेरी सोनम गुप्ता बेवफा है?’ व ‘खदारी’ यांसारख्या चित्रपटांतही काम केलं आहे.
