tv serial couple apurva agnihotri shilpa saklani announce to become parents after 18years of marriage shared a video spg 93 | लग्नाच्या १८ वर्षानंतर कलाकार दाम्पत्य झाले आई-बाबा; व्हिडीओ शेअर करत म्हणाले... | Loksatta

लग्नाच्या १८ वर्षानंतर कलाकार दाम्पत्य झाले आई-बाबा; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

या व्हिडीओवर चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत तसेच त्यांचे कौतुकदेखील करत आहेत

लग्नाच्या १८ वर्षानंतर कलाकार दाम्पत्य झाले आई-बाबा; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

बॉलिवूडमधील दाम्पत्यांना अपत्य झाल्यावर त्याची चर्चा होतेच. बाळाच्या अगदी त्यांच्या जन्मापासून ते त्याचं नामकरण करण्यापर्यंत चाहत्यांना उत्सुकता लागलेली असते. आलिया रणबीर यांना नुकतीच मुलगी झाली. बॉलिवूडप्रमाणे त्यांचप्रमाणे टीव्ही जगातील कलाकारांचे आयुष्य कायमच चर्चेत असते. अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री, या दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे, ज्यावरून त्याचे चाहते आनंदी झाले आहेत.

हे दोन्ही कलाकार इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत आणि त्यांची केमिस्ट्रीही अफलातून आहे. लग्नाच्या १८ वर्षांनंतर दोघेही पहिल्यांदाच पालक झाले आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपे आपल्या लहान बाळाला आपल्या मांडीत धरून तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये त्यांची मुलगी दिसत आहे. अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर अपूर्व कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.

तुमच्यापेक्षा दाक्षिणात्य स्टार्स….” चाहत्याला ढकलल्यामुळे हृतिकवर चाहते संतापले; व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओवर चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत तसेच त्यांचे कौतुकदेखील करत आहेत. व्हिडीओमध्ये त्यांनी कॅप्शन लिहला आहे, “म्हणूनच माझा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास वाढदिवस बनला, कारण देवाने आम्हाला आतापर्यंतची सर्वात खास, अविश्वसनीय, आश्चर्यकारक, चमत्कारी भेट दिली आहे. मी आणि शिल्पा आनंदाने आमची लाडकी मुलगी ईशानी कानू अग्निहोत्रीची ओळख करून देऊ इच्छितो. कृपया तिला आशीर्वाद द्या.” अशा शब्दात त्याने कॅप्शन लिहला आहे.

या जोडप्याने २००४ साली लग्न केले होते. अपूर्व अग्निहोत्रीने ‘परदेस’, ‘प्यार कोई खेल नहीं’ यांसारख्या चित्रपटांमध्ये आणि ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘अजीब दास्तान है ये’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. शिल्पाने कुसुम’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘नच बलिए १’ बिगबॉस ७ या मालिकांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 14:26 IST
Next Story
Video : “गुरुजींनी मांडले आहेत समोर चार पाठ…” राणादाने घेतलेला उखाणा ऐकून पाठकबाई लाजल्या अन्…