scorecardresearch

“मी सेमी प्रेग्नंट…” वाढलेल्या पोटाचा फोटो शेअर करत उर्फी जावेदचं मोठं वक्तव्य

उर्फीने शेअर केलेल्या या फोटोकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

urfii

उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. तिच्या अतरंगी फॅशनमुळे आतापर्यंत अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा तिने परिधान केलेल्या नव्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. नुकताच तिने तिच्या एका हटके लूकमधील व्हिडीओ पोस्ट केला. पण हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी ती गरोदर असल्याचा अंदाज वर्तवला. आता त्यावर उर्फीने उत्तर दिलं आहे.

उर्फी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. जवळपास रोजच ती हटके कपड्यांमध्ये दिसते. आता नुकतीच ती एका विचित्र अंदाजात दिसली. तिने ऑफ व्हाईट रंगाची बिकिनी घातली असून अंगाभोवती माकडाच्या शेपटी असते त्याप्रमाणे जाड दोरी सारखं काहीतरी गुंडाळलं आहे. पण या व्हिडीओत तिचं पोट थोडं पुढे आलेलं दिसत असल्याने ती प्रेग्नंट आहे असं अनेकांनी म्हंटल. आता उर्फीने त्या प्रतिक्रियेवर सडेतोड उत्तर देत या चर्चांना पूर्णवीराम दिला आहे.

आणखी वाचा : राखी सावंतच्या आईच्या निधनानंतर सलमान खानने अभिनेत्रीला केला फोन, माहिती देत भाऊ राकेश म्हणाला…

तिच्या हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं . एकाने लिहिलं, “हे काहीतरी वेगळं आहे. या आधी असं कधीही काही पाहिलं नाही.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही तर माकडाची शेपूट आहे. तू तीही चोरलीस का?” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “कदाचित तिला दोरी उड्या मारता येत नाहीत. त्यामुळे दोरी उड्या मारताना त्यातच अडकली गेली आहे.” तर काहींनी ती गरोदर असल्याचं म्हटलं.

हे वाचा : Video: “अरे! ही तर माकडाची शेपूट…” उर्फी जावेदच्या अतरंगी स्टाईल पाहून नेटकरी हैराण

त्यानंतर उर्फीने ती गरोदर असल्याचं नेटकऱ्यांचा झालेला गैरसमज दूर केला आहे. उर्फीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. तिने तिच्या या लूकमधला एक फोटो शेअर करत लिहीलं, “माझ्या मासिक पाळीचा पहिला दिवस होता आणि त्यामुळे सूज येत होती. यात मी सेमी प्रेग्नंट दिसत आहे.” यासोबत आणखी एक स्टोरी पोस्ट करत उर्फीने लिहीलं, “मुलींनो, स्वतःवर जास्त दबाव आणू नका कारण सपाट पोट असणं हे फक्त एक मिथ आहे.” तिच्या या स्टोरीमुळे ती गरोदर आहे या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:43 IST