Video: "अरे! ही तर माकडाची शेपूट..." उर्फी जावेदच्या अतरंगी स्टाईल पाहून नेटकरी हैराण | Urfi javed got trolled because of her new fashion | Loksatta

Video: “अरे! ही तर माकडाची शेपूट…” उर्फी जावेदच्या अतरंगी स्टाईल पाहून नेटकरी हैराण

नुकतीच ती एका विचित्र अंदाजात दिसली.

urfi

उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. याच मुद्द्यावरून सध्या भाजप नेत्या चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. परंतु उर्फीने माघार घेतली नाही. तिने तिची हटके फॅशन सुरूच ठेवली. तिच्या अतरंगी फॅशनमुळे आतापर्यंत अनेकदा तिला ट्रोल करण्यात आलं आहे. आता पुन्हा एकदा तिने परिधान केलेल्या नव्या कपड्यांमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

उर्फी सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असते. जवळपास रोजच ती हटके कपड्यांमध्ये दिसते. आता नुकतीच ती एका विचित्र अंदाजात दिसली. त्यावरून नेटकरी तिला ट्रोल करू लागले आहेत.

आणखी वाचा : अतिउत्साहीपणा नडला! उर्फी जावेदच्या शरीरावर जखमांच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली…

सध्या उर्फीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. यात तिने ऑफ व्हाईट रंगाची बिकिनी घातली असून अंगाभोवती माकडाच्या शेपटी असते त्याप्रमाणे जाड दोरी सारखं काहीतरी गुंडाळलं आहे.तिची ही फॅशन कोणालाही समजली नाही. आता तिच्या या लूकवर नेटकरी प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

हेही वाचा : “मी त्यांना नकार दिला पण तरीही ते…” कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल उर्फी जावेदचा गौप्यस्फोट

नेहमीप्रमाणेच अनेक नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. हा व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिलं, “हे काहीतरी वेगळं आहे. या आधी असं कधीही काही पाहिलं नाही.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही तर माकडाची शेपूट आहे. तू तीही चोरलीस का?” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “कदाचित तिला दोरी उड्या मारता येत नाहीत. त्यामुळे दोरी उड्या मारताना त्यातच अडकली गेली आहे.” तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “ही स्टाईल करून तू नक्की काय साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेस?” त्यामुळे आता पुन्हा एकदा उर्फीने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 19:27 IST
Next Story
‘अनुपमा’ फेम अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान गाडी; किंमत ऐकून व्हाल थक्क