Premium

९५व्या वर्षीही लग्नसमारंभात ड्रम वाजवून पोट भरायचे आजोबा, उर्फी जावेदने केली मदत, दर महिन्याला पैसे पाठवणार अन्…

उर्फी जावेदच्या मनाचा मोठेपणा! ९५व्या वर्षी लग्नसमारंभात ड्रम वाजवून पोट भरणाऱ्या आजोबांना केली मदत

urfi-javed
९५ वर्षीय आजोबांना उर्फी जावेदची मदत. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. चित्रविचित्र कपड्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी उर्फी सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. उर्फीने ९५ वर्षीय काम करणाऱ्या आजोबांना मदतीचा हात पुढे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एका आजोबांचा व्हिडीओ शेअर केला होत. ९५व्या वर्षीही ते आजोबा पोट भरण्यासाठी काम करत होते. एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये आजोबा लग्नसमारंभात बाजा वाजवताना दिसत होते. उर्फीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत “कोणीतरी यांचा नंबर व पत्ता मला पाठवा,” असं लिहिलं होतं.

हेही वाचा>> “मी आणि अजितदादाने हा सिनेमा पाहिला”, TDM चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “बारामतीतील सुपुत्र…”

उर्फीच्या या स्टोरीनंतर ज्या इन्स्टाग्राम पेजने हा व्हिडीओ शेअर केला होता, त्यांनी तिला ९५व्या वर्षीय आजोबांचा नंबर व पत्ता मिळवून देण्यास मदत केली. त्यानंतर उर्फीने त्या आजोबांना काही पैसे देऊ केले. त्याबरोबरच दर महिन्याला थोडे पैसे पाठवून देणार असल्याचंही उर्फीने म्हटलं आहे.

उर्फीने या ९५ वर्षीय आजोबांचा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर करत त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या इन्स्टा पेजचे आभार मानले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Urfi javed helps 95 years old man who played drum in wedding to survive kak