urfi javed tells sunny leone that she can not compete with her outfit | Loksatta

सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”

उर्फी जावेद ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे.

सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”
उर्फी जावेदने सनी लिओनीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायमच सगळ्याचं लक्ष वेधून घेत असते. चित्रविचित्र कपड्यांमधील तिचे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

उर्फी एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी व अर्जुन बिजलानी करत आहेत. विचित्र कपड्यांमुळे लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फीच्या कपड्यांची भूरळ बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीलाही पडली. शोमध्ये सनीने उर्फीच्या हटके कपड्यांचं कौतुक केलं. “उर्फी तुझे कपडे छान आणि बीचवेअरसाठी एकदम मस्त असतात. मला तुझे कपडे खूप  आवडतात”, असं सनी लिओनी म्हणाली.

हेही वाचा >> Video: राखी सावंतचा पदर पकडला, तिच्या मागे धावले अन्…; ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> “तुमच्या शरीराची ठेवण…” बोल्ड फोटो शेअर करत प्राजक्ता माळीने दिला हटके सल्ला

सनी लिओनीने कपड्यांचं कौतुक केल्यानंतर उर्फीने तिचे आभार मानले. त्यानंतर उर्फी म्हणाली, “माझ्या हटके कपड्यांमुळेच मी ओळखली जाते. तू माझ्याशी स्पर्धा करू शकतेस पण माझ्या कपड्यांबरोबर कधीच स्पर्धा करू शकत नाहीस. कारण ते नेहमीच सगळ्यांच्या विचारापलीकडे जाऊन बनवले जातात”.

हेही पाहा>> Akshya-Hardik Wedding: हातमागावर विणलेली पैठणी, नथ अन् चाफ्याची फुलं; पारंपरिक वेशातील पाठकबाईंच्या मंगळसुत्राने वेधलं लक्ष

उर्फीने सनी लिओनीला दिलेल्या या उत्तराची बरीच चर्चा रंगली आहे. सनी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री असून अभिनयाबरोबरच फॅशनसाठीही ती ओळखली जाते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 20:31 IST
Next Story
Video: राखी सावंतचा पदर पकडला, तिच्या मागे धावले अन्…; ‘बिग बॉस’च्या घरातील किरण मानेंचा व्हिडीओ व्हायरल