Video: टॉयलेट पेपरपासून ड्रेस बनवणाऱ्या उर्फी जावेदवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले “रमजान महिन्यात…”

टॉयलेट पेपरपासून ड्रेस बनवल्यामुळे उर्फी जावेद ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

urfi javed troll
उर्फी जावेद ट्रोल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अंतरंगी ड्रेसमुळे कायमच चर्चेत असते. चित्रविचित्र कपड्यांमधील उर्फीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी वायर तर कधी पोत्यापासून ड्रेस बनवून उर्फी सगळ्याचं लक्ष वेधून घेत असते. फॅशनसाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्फीचं फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

उर्फी सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतीच उर्फीने इन्स्टाग्रामवरुन तिच्या नव्या ड्रेसचा व्हिडीओ शेअर केला आहे. उर्फीने चक्क टॉयलेट पेपरपासून ड्रेस बनवला आहे. व्हिडीओमध्ये उर्फीची बहीण अस्फी जावेद टॉयलेट पेपर कुठे आहेत असं विचारताना दिसत आहे. त्यानंतर उर्फी टॉयलेट पेपरपासून बनवलेला ड्रेस घालून आल्याचं दिसत आहे.

हेही वाचा>> “मला तुझी खूप आठवण येते” तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरचं वाढदिवशी जॅकलिन फर्नांडिसला प्रेमपत्र, म्हणाला “माय बेबी…”

हेही वाचा>>Video: पुरस्कार सोहळ्यातील डोळ्यांत पाणी आणणारा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ जाधवची पोस्ट, म्हणाला “अशोक मामा…”

उर्फीचा हा नव्या ड्रेसमधील व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्फीचा हा कारनामा पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त कमेंट केल्या आहेत. “रमजानच्या महिन्यात तरी अशी कामं करू नको” असं एकाने म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “रमजान आहे दीदी, असं नको करुस” अशी कमेंट केली आहे.

एका नेटकऱ्याने “रमजान सुरू आहे, असं वागणं बंद कर” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने कमेंट करत “अगं रमजानमध्ये तरी हे सगळं सो़ड” असं म्हटलं आहे.

उर्फीच्या ड्रेसवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी उर्फी विरोधात तक्रारही दाखल केली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 16:53 IST
Next Story
“अशोक मामांना आपलं नाव…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध विनोदवीराच्या पोस्टने वेधलं लक्ष
Exit mobile version