urfi javed slams teenager group who abused her on call | Loksatta

तरुण मुलाची फोनवरच उर्फी जावेदला शिवीगाळ; अभिनेत्री संतापून म्हणाली “आई-वडिलांना…”

उर्फी जावेदने फोनवर शिवीगाळ करणाऱ्या मुलांना दिलं सडेतोड उत्तर

तरुण मुलाची फोनवरच उर्फी जावेदला शिवीगाळ; अभिनेत्री संतापून म्हणाली “आई-वडिलांना…”
(फोटो सौजन्य- उर्फी जावेद इन्स्टाग्राम)

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायमच चर्चेत असते. आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे ती नेहमीच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करते. यामुळे अनेकदा उर्फीला ट्रोलही केलं जातं. तिचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

सध्या उर्फीला एका किशोरवयीन मुलांच्या ग्रुपकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये उर्फीने फोन करुन त्रास देणाऱ्या मुलाचं अकाऊंट शेअर केलं आहे. “हा मुलगा व त्याचे दहा मित्र मला रोज कॉल करत आहेत. माझा नंबर यांना कुठून मिळाला हे मला माहीत नाही. ते फोनवर मला शिव्या देत आहेत”, असं तिने स्टोरीमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला मिळाली नवी मालिका, पोस्ट शेअर करत म्हणाली…

हेही वाचा>>Video: अक्षया-हार्दिकच्या लग्नानंतर ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादा-पाठकबाईंचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

पुढे उर्फी “आजच्या पिढीतील मुलांना काय झालं आहे? कारण नसताना ते मला त्रास देत आहेत. या मुलांविरोधात मी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी जात आहे. या मुलांच्या आई-वडिलांना कोणी ओळखत असेल तर मला सांगा. मी त्या व्यक्तीला बक्षीस देईन”, असंही म्हणाली आहे.

हेही वाचा>> “अक्कलकोटला गेल्यानंतर मला पहिल्यांदा…” ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव

उर्फी सध्या ‘स्प्लिट्सविला १४’ या एमटीव्हीवरील रिएलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. बिग बॉस १६मध्ये स्पर्धक असलेल्या बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक साजिद खानविरोधातही उर्फीने वक्तव्य केल्यामुळे ती चर्चेत होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 11:21 IST
Next Story
“नक्कल करण्यापेक्षा…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाचा ‘फू बाई फू’ला टोला