मराठी संगीतविश्वात शिंदे घरण्याचा दबदबा अजूनही आपल्याला बघायला मिळतो. ज्येष्ठ प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे यानेसुद्धा त्यांचा सांगीतिक वारसा जपला आहे. 'बिग बॉस' मराठीमधून सर्वप्रथम तो समोर आला आणि काहीच दिवासात त्याने लोकांच्या मानत घर केलं. उत्कर्ष गायक तर आहेच याशिवाय तो डॉक्टरकी, लेखन, संगीत दिग्दर्शन या क्षेत्रातही पारंगत आहे. उत्कर्ष सध्या सोनी मराठीवरील 'ज्ञानेश्वर माऊली' या मालिकेत संत चोखामेळांची भूमिका साकारत आहे. त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तो पुण्यात गेला असता त्याने एका हॉटेलात जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी उत्कर्षला आलेला चाहत्यांचा अनुभव त्याने शेअर केला आहे. आणखी वाचा : फरहान अख्तरची मेहुणी लवकरच झळकणार मराठी चित्रपटात, ‘या’ अभिनेत्याबरोबर शेअर करणार स्क्रीन उत्कर्षने चाहत्यांबरोबरचा एक व्हिडीओ शेअर करत मोठी पोस्ट लिहिली आहे. त्या पोस्टमध्ये तो म्हणाला, "मूठभर मास अंगावर चढलं… मेडिकल कॉलेजच्या दिवसापासून पुण्यात सिटी मध्ये गेलो कि आवर्जून गचागच भरलेल्या दुर्वाअंकुर डाईनिंग हॉल मध्ये जेवायची भलतीच मला आवड. चुटकी वाजून वाडपीला इशाऱ्याने सांगणारे वेटर,मॅनेजर…क्या बात इतकी गर्दी मॅनेज करायची दुर्वाअंकुर डाईनिंग हॉलची एक वेगळीच स्टाईल .फरक इतकाच कि काल पर्यंत मला तिथे निवांत जेवता यायचं पण आता तिथे गेलो की नेहमीप्रमाणे पोट भरेपर्यंत जेवण तर होतंच, पण आता जेवताना तिथे आलेल्या गर्दीतुन प्रेम आशीर्वाद कौतुक इतकं मिळत की तिथे पोटाची भूक भागतेच पण सोबतच मन तृप्त होतं ते काही औरच असत." पुढे उत्कर्षने त्याला भेटलेल्या चाहत्यांचा अनुभव सांगितला. त्याने लिहिले, 'आता ह्या काकू (जोशी कि देसाई कि नेने )नाव काही आठवत नाही. पण पेठेमधल्या काकू हे जाणवलं आणि त्यांच्या सोबतच्या त्या ताई भेटल्या मी जेवत असताना प्रेमाने आल्या खांद्यावर हाथ ठेऊन उत्कर्ष शिंदे ना ?असा प्रश्न विचाराला आणि मी हो म्हणताच. कौतुकाचा अक्षरशः पाऊस माझ्यावर त्यांनी पाडला . 'तू' म्हंटलं तर चालेल ना असं विचारताच तू आमच्या परिवारातील, घरातला वाटतोस म्हणून तू जेवतोयस तरीही तुला जेवत असताना बोलायाला आम्ही आलो, तू किती उत्तम आहेस, आम्हला आवडतोस तुझ्या साठीच आम्ही बिगबॉस बघायचो.आणि आता तू ज्ञानेश्वर माऊलीतली संत चोखा मेळा भूमिका हि किती सुंदर केलीस अस म्हणत भरभरून कौतुक करत नजरच काढली…" हेही वाचा : “अजूनही काहींना स्वातंत्र्य मिळणं बाकी आहे.” बिग बॉस मराठी फेम उत्कर्ष शिंदेची ‘ती’ पोस्ट व्हायरल उत्कर्षची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट करत उत्कर्षचे चाहते त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तसेच त्याच्या अनेक कलाकार मित्रांनीही या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांचे प्रेम हे किती ऊर्जा देते हे सांगितले आहे.