छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सध्या नवनवीन ट्विस्ट येत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आणि कथानकातील उत्सुकता वाढवण्यासाठी लोकप्रिय मालिकांमध्ये नेहमीच विविध ट्विस्ट अँड टर्न्स आणले जातात. गेल्या काही दिवसांपासून अक्षया हिंदळकर, माधुरी पवार, क्षिती जोग अशा बऱ्याच अभिनेत्रींनी 'स्टार प्रवाह'च्या मालिकांमध्ये एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं. आता यांच्या पाठोपाठ मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री छोट्या पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'वादळवाट' या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेली प्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर लवकरच 'स्टार प्रवाह'च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेणार आहे. आता ती या मालिकेत कोणती भूमिका साकारणार, तिच्या भूमिकेचं नाव काय? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात… ‘त्या’ एका डायलॉगने संपलं करिअर, आमिर-शाहरुखला टक्कर देणारा अभिनेता अचानक झाला गायब, नाव बदललं अन्… 'स्टार प्रवाह'च्या 'मुरांबा' मालिकेत लवकरच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. इरावती मुकादम असं या व्यक्तिरेखेचं नाव असून सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधर इरावती हे पात्र साकारणार आहे. इरावती परदेशात अनेक वर्षे राहून आता मुकादम कुटुंबात पाऊल ठेवतेय. डावपेच करण्यात हुशार असणाऱ्या इरावतीला रमाची जागा रमासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या माहीने घ्यायला हवी असं वाटतंय आणि त्याच मनसुब्याने ती मुकादमांच्या घरी आली आहे. इरावतीचा प्लॅन यशस्वी होणार का? तिच्या आगमनाने मुकादम कुटुंबात काय वादळं उठणार? हे पाहणं उत्सुकतेचं असेल. हेही वाचाएकेकाळी बॅक स्टेजला तिकीटं विकणारा आता गाजवतोय दाक्षिणात्य सिनेसृष्टी; अभिनेता म्हणाला, “इंडस्ट्रीत काम मिळवणं…” अदिती सारंगधर या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना अदिती सारंगधर म्हणते, "मुरांबा मालिकेने नुकतेच एक हजार भाग पूर्ण केले. हजारचा टप्पा गाठल्यानंतर अतिशय उत्कंठावर्धक वळणावर मला एका चांगल्या भूमिकेसाठी विचारणा झाली. अशा पद्धतीची भूमिका मी याआधी केलेली नाही. मी पहिल्यांदा मेडिटेशन हीलरच्या रुपात दिसणार आहे. एका छोट्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येताना खूप आनंद येतोय. मालिकेत अशा वळणावर इरावती पात्राची एन्ट्री होतेय जिथे खरं काय आणि खोटं काय याची पारख करण्यात संपूर्ण मुकादम कुटुंब गुंतलं आहे. इरावतीच्या एन्ट्रीने ही गुंतागुंत वाढणार की कमी होणार यासाठी तुम्ही जरूर मालिका पाहा." https://www.instagram.com/reel/DJbM4BjzWVV/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== दरम्यान, मुरांबा ही मालिका 'स्टार प्रवाह' वाहिनीवर दुपारी दीड वाजता प्रसारित केली जाते. यामध्ये अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री शिवानी मुंढेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.