‘बिग बॉस मराठी ५’ हे पर्व खूप गाजले. या पर्वात कलाकारांबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील सामील झाले होते. त्यामुळे या पर्वाची मोठी चर्चा झाली. या स्पर्धकांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केल्याचे पाहायला मिळाले. अनेकदा भांडणे पाहायला मिळाली, तर काही स्पर्धकांमध्ये मैत्रीदेखील पाहायला मिळाली. बिग बॉसच्या या पाचव्या पर्वात दोन गट पाहायला मिळाले. एका गटात निक्की तांबोळी, अरबाज पटेल, वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) व जान्हवी किल्लेकर हे स्पर्धक होते. तर दुसऱ्या गटात पंढरीनाथ कांबळे, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar), धनंजय पोवार, योगिता चव्हाण, सूरज चव्हाण आणि आणखी इतर स्पर्धक होते. या दोन गटांत सतत भांडणे पाहायला मिळत होती. मात्र, शोबाहेर सर्व स्पर्धकांमध्ये मैत्री पाहायला मिळत आहे. अनेक स्पर्धक या पर्वानंतर एकमेकांची भेट घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो

आता अंकिता वालावलकरने वैभव चव्हाणची भेट घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अंकिता वालावलकरने तिचा होणारा नवरा कुणाल भगत याच्याबरोबर बारामतीमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी तिने वैभव चव्हाणची भेट घेतल्याचे समोर आले आहे. वैभव चव्हाणने अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांच्याबरोबर काढलेले फोटो शेअर केले आहेत. वैभवने सोशल मीडियावर अंकिता आणि कुणालला टॅग करीत लिहिले, “अंकिता आणि आमचे दाजी यांचं बारामतीमध्ये मनापासून स्वागत.” शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्यांच्या हातात श्रीगणेशाची मूर्तीदेखील दिसत आहे. या फोटोंमध्ये तिघेही आनंदात दिसत आहेत.

sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Bigg Boss Marathi Ankita Walawalkar Meets Suraj Chavan
अखेर भेट झालीच! होणाऱ्या नवऱ्यासह अंकिता पोहोचली बारामतीला; सूरजच्या गावच्या शेतात बसून मारला ‘या’ पदार्थावर ताव
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
Aroh Welankar New Villa
Bigg Boss फेम अभिनेत्याने पुण्यात खरेदी केला आलिशान व्हिला! चाहत्यांना दाखवली पहिली झलक, मराठी कलाकारांनी केलं कौतुक
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
ghanshyam aka chota pudhari meets nikki arbaz
Video : निक्कीला भेटण्यासाठी मुंबईत आला घन:श्याम! अरबाजला चुकून ‘या’ नावाने मारली हाक अन्…; पुढे काय घडलं?
इन्स्टाग्राम

वैभव चव्हाणने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करीत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने म्हटले, “खरंच वैभव चव्हाणदादा पहिल्यापासून अंकिताबरोबर हवा होतास. बिग बॉसमध्ये उगाच निक्कीच्या नादी लागलास. असो! तुला भविष्यासाठी शुभेच्छा.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “बी टीममध्ये हवा होतास.” आणखी एका नेटकऱ्याने म्हटले, “वैभव मस्त माणूस आहे.”

v

त्याबरोबरच काही नेटकऱ्यांनी म्हटले, “असं गेट टुगेदर ए टीमवाल्यांनी कधी केलं नाही”, “मला विश्वास बसत नाही. बिग बॉसच्या घरात एवढे भांडण करून बाहेर आल्यावर इतक्या प्रेमानं कस काय राहू शकता?”, “खरंच वैभवला मानलं तो एकदासुद्धा अरबाज आणि निक्कीला भेटला नाही.”

हेही वाचा: दाक्षिणात्य अभिनेते दिल्ली गणेश यांचे वृद्धापकाळाने निधन, हवाई दलातील सेवेनंतर सिनेसृष्टीत केलं होतं पदार्पण; ‘अशी’ होती कारकीर्द

दरम्यान, अंकिताने नुकतीच बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाणची भेट घेतली. त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सूरजबरोबरचा व्हिडीओ शेअर करताना त्याला लग्नाचे आमंत्रण दिल्याचे कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या भेटीची चाहते अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. कारण- बिग बॉसच्या घरात त्यांच्यामध्ये चांगलेच बॉण्डिंग असल्याचे पाहायला मिळाले. आता अंकिताने सूरजची भेट घेतल्यावर चाहत्यांना आनंद झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader