Premium

ट्रकने कारला धडक दिली अन्…; वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात नेमका कसा झाला? सीटबेल्ट न लावल्यामुळे अभिनेत्रीचा मृत्यू?

Vaibhavi Upadhyaya Died : वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात नेमका कसा झाला?

vaibhavi-upadhyaya-died
वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात नेमका कसा झाला? (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sarabhai vs Sarabhai Actress Vaibhavi Upadhyaya Died : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचं अपघाती निधन झालं आहे. सोमवारी(२२ मे) हिमाचल प्रदेशात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. ती ३९ वर्षांची होती. तिच्या मृतदेहावर बुधवारी(२४ मे) अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. हा अपघात इतका भीषण होता की वैभवीचा जागीच मृत्यू झाला. वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. एका वळणावर कारचा अपघात होऊन कार दरीत कोसळली. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचं वृत्त होतं. परंतु, वैभवीच्या गाडीचा अपघात नेमका कशामुळे झाला, हे समोर आलं आहे.

हेही वाचा>> Vaibhavi Upadhyaya Died : ‘साराभाई वर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्रीच्या निधनानंतर सुमित राघवण हळहळला, ट्वीट करत म्हणाला…

वैभवीच्या कारच्या अपघात नेमका कशामुळे झाला?

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, वैभवी आणि तिचा होणारा पती कारमधून प्रवास करत होते. एका वळणावर त्यांनी समोरुन येणाऱ्या ट्रकला जाण्यासाठी रस्ता दिला. वैभवीचा होणारा पती कार चालवत होता. त्या वळणावर ट्रकने कारला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की त्यांची कार दरीत कोसळली. अपघात झाला त्यावेळी वैभवीने सीट बेल्ट लावले नव्हते. कारमधून वैभवी बाहेर फेकली गेली व त्यामुळे तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली.

कारचा अपघात झाल्यानंतर लगेचच आजूबाजूच्या काही लोकांनी वैभवीला बाहेर काढलं. परंतु, तोपर्यंत फार उशीर झाला होता. कार्डिअक अरेस्ट व डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे वैभवीचा मृत्यू झाला होता. वैभवीचा होणारा पती मात्र सुदैवाने या अपघातातून बचावला. या अपघातात त्याच्या हाताला दुखापत झाली आहे.

हेही वाचा>> जेवण ऑर्डर केलं अन्…; नितेश पांडे यांच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय घडलं? हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह

वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. यातही ‘साराभाई’ या मालिकेतील जास्मीन या पात्राने तिला विशेष ओळख मिळवून दिली. वैभवीने २०२० मध्ये ‘छपाक’ या चित्रपटातही काम केले होते. यावेळी ती प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणबरोबर झळकली होती. त्याबरोबरच तिने ‘तिमिर’ (२०२३) या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. गुजराती कलाविश्वात तिचं मोठं नाव होतं. वैभवीने ‘क्या कसूर है अमला का’ आणि ‘प्लीज फाइंड अटॅच्ड’ या डिजीटल सीरिजमध्येही काम केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vaibhavi upadhyaya died how sarabhai vs sarabhai actress car met with an accident details kak

First published on: 25-05-2023 at 13:12 IST
Next Story
‘मन झालं बाजींद’ मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या पतीचे निधन