छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात तिचा मृत्यू झाला. ती ३९ वर्षांची होती. तिच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या निधनानंतर विविध चर्चा रंगताना दिसत आहे. नुकतंच तिचा होणारा नवरा जय गांधीने यावेळी नेमकं काय घडलं? याबद्दल सांगितले आहे.

वैभवी उपाध्यायच्या कारचा अपघात सोमवारी (२२ मे) हिमाचल प्रदेशातील कुल्लू या ठिकाणी झाला. वैभवी ही तिच्या होणाऱ्या पतीबरोबर फिरण्यासाठी गेली होती. यावेळी दुर्देवाने वैभवीचे निधन झाले. तर तिचा होणारा पती जय गांधीला दुखापत झाली. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे.
आणखी वाचा : “कार दरीत कोसळल्यानंतर वैभवी उपाध्याय जीव वाचवण्यासाठी करत होती धडपड, पण…”; पोलिसांनी सांगितला सविस्तर घटनाक्रम

everyone will do campaign for Mahayuti candidate without getting upset says Neelam Gorhe
कोणीही नाराज न होता महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा : नीलम गोऱ्हे
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
Patna High court
मुलांसाठी पत्नीच्या पालकांकडून पैसे मागणे हा हुंड्याचा प्रकार नाही; उच्च न्यायालयाचा पतीला दिलासा
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

नुकतंच ई-टाईम्सने जय गांधीशी संवाद साधला. यावेळी त्याने त्या अपघातावेळी काय घडलं? याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. “माझ्यावर या अपघाताचा गंभीर परिणाम झाला आहे. मी अजूनही या धक्क्यातून सावरलेलो नाही. माझे हात-पाय अजूनही थरथरत आहेत.” असे त्याने सांगितले.

आणखी वाचा : Video : “आमच्या नात्यात…” आशिष विद्यार्थींनी सांगितलं दुसरं लग्न करण्याचं खरं कारण, लव्हस्टोरीची माहिती देत म्हणाले “आम्ही एकमेकांना…”

“अनेक लोकांचा समज असा असतो की जेव्हा तुम्ही रोड ट्रीप करता तेव्हा वेगाने गाडी चालवता, पण २२ मे रोजी असं काहीही झाले नव्हते. आमची गाडी एका बाजूला उभी होती. आम्ही एक ट्रक जाण्याची वाट पाहत होतो. मी आता बोलण्याच्या मनस्थितीत नाही. पण एक गोष्टी नक्की की, आम्ही सीट बेल्ट लावलेला नाही, आमच्या गाडीचा वेग जास्त होता, अशा अफवा पसरवणं लोकांनी बंद करावं”, असे जयने म्हटले.

आणखी वाचा : “तुम्हाला आशीर्वाद…” आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधल्यानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट, म्हणाली “खूप खंबीर…”

दरम्यान वैभवीच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘सीआयडी’, ‘अदालत’ आणि ‘साराभाई वर्सेस साराभाई’ या तिच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. यातही ‘साराभाई’ या मालिकेतील जास्मीन या पात्राने तिला विशेष ओळख मिळवून दिली.